Dr-Sanjay-Kute sakal
विदर्भ

Sangrampur : अन आमदार लाठी काठी फिरवतात तेव्हा.

मिरवणूक मध्ये लाठी काठी फिरवत भजना मध्ये सहभाग नोंदवला ;डाँ संजय कुटे

पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर : पारंपरिक लाठी काठी चा खेळ लुप्त होत असताना मिरवणूक मध्ये त्याला उजाळा देऊन आनंद घेण्याचे काम एका आमदारांनी गणेश भक्ता सोबत केल्याने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काल झालेल्या गणेश विसर्जन दरम्यान जळगाव जा विधान सभा संघाचे आमदार डाँ संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवीत स्वतः मिरवणूक मध्ये लाठी काठी फिरवत भजना मध्ये सहभाग नोंदवला. प्रशासनाची जबाबदारी स्वतः कडे घेऊन शांतता पूर्ण शेगाव आणि जळगाव जा शहरातील मिरवणूक पार पडली. जळगाव जा ठाणेदार खामगाव बंदोबस्तात असताना त्यांच्या जागी स्वतः आमदारांनी महत्तवाची भूमिका घेत गणेश भक्तात तल्लीन होऊन गेले.

प्रशासन, गणेश मंडळ व नागरिकानमधे योग्य संवाद ठेवत आमदार डॉ संजय कुटे यांनी शांततेत गणेश विसर्जन चे नियोजन केले होते. त्या साठी मिरवणूक मध्ये जातीने हजर राहून शेगाव आणि जळगाव जा सारख्या मोठ्या शहरात रात्री उशिरा पर्यत भक्तांना आनंद लुटता आला . इतकेच नाही तर मैदानी खेळात स्वतः सहभागी होऊन ऑल इन वन असल्याचे सिद्ध केले.

राज्यातील सत्ता बदल मध्ये राज्यभरात च नाही तर इतर राज्यातही आमदार तथा माजी मंत्री डाँ संजय कुटे यांचे नाव गाजले आहे. त्या नंतर गणेश विसर्जन च्या मिरवणुकी मध्ये आमदारांचा उत्साह पाहता युवा वर्गात जोश निर्माण झाला होता . त्या सर्व बाबी चे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. अभ्यासू आणि सर्वसामान्य जनते सह लहान बालक असो की तरुण वर्ग सर्वामध्ये समरस होणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमदार कुटे म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT