विदर्भ

नागपुरात ट्रकच्या धडकेत तरुणी ठार

सकाळवृत्तसेवा

नागपूर : बँकेत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला मागून भरधाव ट्रकने धडक दिली. या धडकेत युवती जागीच ठार झाली. हा दुर्दैवी अपघात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भीलगाव नाका क्रमांक दोनजवळ झाला. अर्पिता उर्फ अपराजीता नरेंद्र बोरकर (वय 21, रा. कन्हान) असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात अपघाताची मालिका सुरू आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. 

अर्पिता बोरकर ही नागपुरातील एचडीएफसी बॅंकेत सेल्स एक्‍झिकेटिव्ह पदाच्या मुलाखतीसाठी जात होती. मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घरून बॅंकेकडे निघाली होती. भीलगाव नाका नंबर दोन येथे मागून भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत अर्पिता रस्त्याच्या कडेला फेकली गेली. तिच्या पोटाला आणि डोक्‍याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर लगेच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.

युवतीचा मृतदेह लगेच मेयोत रवाना करण्यात आला. आरोपी ट्रकचालक हरपिंदरसिंह संधू (कामठी रोड, खैरी बस स्टॉप) ट्रक सोडून पळून गेला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी ट्रक चालकास पोलिसांनी अटक केली. 

ट्रकची तोडफोड करण्याचा प्रयत्न 

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवतीला धडक दिल्यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी लगेच घटनास्थळावर धाव घेतली. युवतीला उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करीत असताना युवतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून गेला. त्यानंतर ट्रकची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेळेवर पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

वाहतूक पोलिसांचा वचक संपला ! 

शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांचा धाक संपत असल्यामुळे वाहनचालक शिरजोर होत आहेत. अनेक पोलिस निरीक्षक आणि त्याचे खास कर्मचारी केवळ "पैसा वसुली' अभियानात गुंतले असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडली आहे. अशा प्रकाराकडे पोलिस उपायुक्‍तांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा वाऱ्यावर वाहतूक व्यवस्था असल्याने अपघातांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT