drown
drown 
विदर्भ

चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : घरातील बाथरूममधील पाण्याच्या टाकीत तोल जाऊन पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा करून अंत झाला. ही दुर्दैवी घटना कळमन्यात उघडकीस आली. वंशिका मुकेश वर्मा (रा. डिप्टी सिग्नल, कळमना) असे चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश वर्मा हे खासगी व्यवसाय करतात. शनिवारी रात्री नऊ वाजता त्यांची तीन वर्षाची चिमुकली वंशिका ही बाथरूममधील पाण्याच्या टाकीजवळ खेळत होती. टाक्‍यातून पाणी काढत असताना तिचा तोल गेला. ती पाण्याच्या टाकीत पडली. त्यावेळी तिचे वडील घरात काम करीत होते तर आजी भाजी आजी निवडत होती.

वंशिकाच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे दोघांनीही बाथरूमकडे धाव घेतली. तोपर्यंत वंशिकाच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने ती बेशुद्ध पडली होती. वडीलांनी लगेच टाक्‍यातून बाहेर काढून डिप्टी सिंग्नलजवळ असलेल्या डॉ. सोनी यांच्या रूग्णालयात नेले. डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT