Vehicle Burnt Sakal
विदर्भ

अपघात होताच वाहन पेटविले; विद्यार्थिनी गंभीर

भरधाव वेगातील वाहनाने रस्ता क्रॉस करणार्‍या विद्यार्थीनीच्या वाहनाला धडक दिली. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली.

सकाळ वृत्तसेवा

भरधाव वेगातील वाहनाने रस्ता क्रॉस करणार्‍या विद्यार्थीनीच्या वाहनाला धडक दिली. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली.

यवतमाळ - भरधाव वेगातील वाहनाने रस्ता क्रॉस करणार्‍या विद्यार्थीनीच्या वाहनाला धडक दिली. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. अपघात होताच संतप्त जमावाने प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहनाला पेटवून दिले. ही घटना शुक्रवारी (ता.23) दुपारी सव्वापाच वाजतादरम्यान पांढरकवडा मार्गावरील जन्नत पॅलेससमोर घडली.

जोहरा अनिस शेख (वय 18, रा. जफरनगर, यवतमाळ), असे गंभीर जखमी विद्यार्थीनीचे नाव आहे. विद्यार्थिनी कॉलेजमधून घराकडे परत येत असताना दुचाकीने रस्ता ओलांडत होती. भरधाव वेगातील प्रवासी वाहनाने जबर धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलीला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दरम्यान अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनाला पेटवून दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वृत्तलिहिपर्यंत या अपघाताची पोलिसांत नोंद करण्यात आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Alert: सोन्याचे भाव पुन्हा कोसळणार? वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात धक्कादायक संकेत

कॅबिनेटमध्ये मोदी इन्स्टाग्रामवर लक्ष द्यायला सांगतात, राजीनाम्यानंतर प्रधानांचं स्वागत; हेच का पेपरफुटीवर गांभीर्य? गोगोईंचा सवाल

Bank Holidays: ग्राहकांनो, लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकांना सुट्ट्या; RBI ने जाहीर केलेल्या 'या' तारखा नीट लक्षात ठेवा

'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मकरंद अनासपुरेंची धमाकेदार एन्ट्री; एकाच संवादात गुंफली १५ चित्रपटांची नावं

Grocery Price Hike: सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, रोजच्या आयुष्यातील 'या' गोष्टी महाग; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT