girlfriend complaint case of rape registered against boyfriend valentine day love yavatmal sakal
विदर्भ

Valentine Day 2023 : ‘व्हॅलेंटाइन डे’लाच प्रियकर पोहचला कोठडीत

मारेगावातील घटना; प्रेयसीची पोलिसांत तक्रार, पाच वर्षांच्या प्रेमाचा अंत

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : प्रेमदिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याचा मोठा पगडा तरुणाईवर आहे. मात्र, एका प्रियकराला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशीच पोलिस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली. प्रेयसीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला अन् पाच वर्षांच्या प्रेमाचा क्षणात ‘द एण्ड’ झाला. ही घटना मंगळवारी (ता. १४) सकाळी मारेगावात उघडकीस आली.

गजाआड झालेल्या प्रियकराचे नाव अंकित हनुमान सोयाम (वय २४, रा. गणेशपूर) असे आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्याची नात्यातीलच एका तरुणीशी नजरानजर झाली. सुरुवातीला मैत्री व त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकर-प्रेयसीने ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’च्या आणाभाका घेत सर्व मर्यादा ओलांडल्या. मात्र, पाच वर्षे बहरलेल्या या प्रेमाला दृष्ट लागली. त्या दोघांत क्षुल्लक कारणावरून खटके उडू लागलेत.

त्यातच प्रेयसीने अचानक त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, त्याने लग्नास नकार दिला. अखेर प्रेयसीने नातेवाइकांसह सोमवारी (ता. १४) सकाळी थेट मारेगाव पोलिस ठाणे गाठले. ठाणेदार राजेश पुरी यांनी प्रियकराला त्याच्या नातेवाइकांसह पोलिस ठाण्यात बोलावले. तरुण व तरुणी दोघेही सज्ञान असल्याने दोघांचे लग्न व्हावे, यासाठी दोन्ही बाजूंचे मन वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रियकर व दोन्ही बाजूचे नातेवाइक तयार झालेत.

मात्र, ऐनवेळी तरुणीकडील एकाने दुधात मिठाचा खडा टाकला. परिणामी, तरुणीने पोलिसांना तक्रार नोंदविण्याचा आग्रह धरला. अखेर तरुणीच्या आग्रहामुळे पोलिसांनीही प्रियकर अंकित सोयाम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यामुळे ऐन ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याऐवजी त्याच्यावर पोलिस ठाण्याच्या कोठडीत जाण्याची वेळ आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT