राजुरा : बोकडाचे दूध काढताना शेख.
राजुरा : बोकडाचे दूध काढताना शेख. 
विदर्भ

बोकड देतो रोज दीड कप दूध

सकाळ वृत्तसेवा

राजुरा : कधीकधी ऐकावे ते नवलच, असे पहायला मिळते. बाप्याला कधी मूल होत नाही... मग तो दूध तरी देऊ शकतो काय? याचे उत्तर नकारार्थीच असते. पण असे नवल जिल्ह्यातील राजुरा शहरात आढळून आले. येथे बाप्या असलेला बकरा चक्क दूध देतो. दचकलात ना... पण हे  सत्य आहे. हा बोकड सध्या चर्चेचा विषय झाला आहे व या दुधाळू बोकडाला बघण्यासाठी नागरिकांची रीघ लागली आहे. हा बकरा रोज चक्क दीड कप दूध देत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते प्राण्यांमध्ये काही अवयव विकसित न झाल्याने अशी घटना घडते. सध्या राजुरा शहरात मौलाना अबुल कलाम आझाद चौकात राहणाऱ्या अब्दुल शेख यांचा हा बोकड आहे. शेळी-बकरी पालनाची आवड असलेल्या शेख यांच्या घरचा हा भला थोरला बकरा सध्या सर्वत्र उत्सुकतेचा विषय ठरला आहे. एरवी खवय्ये मांसाहारी लोक जिभेच्या चोचल्यांसाठी बोकडाचा शोध घेत असतात. मात्र, शेख यांच्या घरचा बकरा प्रसिद्ध झालाय तो दूध देण्यासाठी. राजुऱ्याचा हा दुधाळू बकरा सध्या चांगलाच भाव खातो आहे.
काही दिवसांपूर्वी शेख यांनी उपचार करण्यासाठी आपल्या बकऱ्याला राजुरा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले होते. डॉक्‍टरांनी त्याची तपासणी करताना हा दूध देऊ शकेल, अशी शंका व्यक्त केली होती आणि खरंच काही दिवसांनी बकरा दूध देऊ लागला. काही वेळा दूध काढले नाहीतर ते जमिनीवर ओघळू लागले. शेवटी त्याच्या वेदना कमी करण्यासाठी शेख यांनी त्याचे रोज दूध काढणे सुरू केले.
एखादे महाकठीण काम करायचे असल्यास त्याला "आता बकऱ्याचे दूध काढणारा का?' असा वाक्‍प्रचार गावखेड्यांमध्ये सर्रास वापरला जातो. मात्र, शेख यांच्या बोकडामुळे या वाक्‍प्रचारात आता फारसा अर्थ राहिलेला नाही.

बोकडाने दूध देणे शक्‍य आहे. प्राणी जगतात असे कधीकधी घडते. शरीराचे काही अवयव पूर्णपणे विकसित होण्याची प्रक्रिया रखडली वा त्यात काही दोष निर्माण झाले की, असे घडते. त्यात विशेष काही नाही. या दुधाळू बकऱ्याचा आधीचा इतिहास कसा आहे, हे जाणून घेतल्यानंतर व त्याचे संपूर्ण निरीक्षण केल्यावरच त्याबाबत ठोस निष्कर्ष काढता येईल.
- डॉ. प्रमोद जल्लेवार,
पशुधन विकास अधिकारी, राजुरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT