Education  sakal
विदर्भ

Gondia : न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आपला कारभार सुरू ठेवणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याची खुर्ची जप्त

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची व संगणक जप्तीची कारवाई करण्यात आली.

राजेश नागरे

गोंदिया : न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आपला कारभार सुरू ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याची खुर्ची व संगणक साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार, बुधवारी (ता. ३) माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची व संगणक जप्तीची कारवाई करण्यात आली.

आमगाव तालुक्यातील शिवणी येथील सेवानिवृत्त शिक्षक नीलकंठ धानूजी भुते यांच्या १५ वर्षाच्या सेवेचा कालावधी ग्राह्य धरून त्याच्या वेतनापोटी त्यांना २० लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता माध्यमिक शिक्षणाधिकारी आपला मनमर्जी कारभार चालवीत होते.

शिक्षक नीलकंठ भुते यांनी १९८४ ते १९८९ या काळात नॅशनल ज्युनिअर कॉलेज परसवाडा येथे प्राध्यापक म्हणून सेवा दिली. त्यानंतर १९९१ ते १९९७ या काळात भूषणराव पाटील तिल्ली मोहगाव या शाळेत ते कार्यरत होते. परंतु, संस्थेच्या अंतर्गत कलहामुळे ती शाळा बंद पडली. शासनाने त्यांचे समायोजन केले नाही. त्यामुळे त्या शाळेतील सर्व शिक्षक उच्च न्यायालयात गेले होते. त्या प्रकरणाचा निकाल २०१२ मध्ये लागला.

त्यांना सेवेत सामावून घेण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यावर त्यांना ६ मे २०१३ ला गोंदिया शहरातील मनोहर म्युनिसिपल हायस्कूल शाळेत नियुक्ती देण्यात आली. त्यांची वयोमानानुसार ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सेवानिवृत्ती झाली. दरम्यान, त्यांची मधातल्या काळातील सेवा ग्राह्य धरण्यात यावी, यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

त्यांची मागणी न्यायालयाने ऐकून त्यांना त्या सेवेचे २० लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०२१ ला दिले होते. परंतु, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. तथापि, बुधवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी दिघोरे यांची खुर्ची व संगणक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई डी. टी. शहारे, डी. बी. नागपुरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : जिल्हा परिषद, पंचायत समितीतही स्वीकृत सदस्य; साहेब, आण्णा, दादा, मामांना मिळणार संधी, अधिनियमात दुरुस्ती होणार

पाच दिवसांपूर्वीच घेतलेली नवीकोरी बस, अग्नितांडवात २० जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Panchang 15 October 2025: आजच्या दिवशी नारायण कवच स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Diwali for Diabetics: शुगर नको, पण गोडपणं हवं? मग मधुमेहींनी आर्टिफिशियल स्वीटनरने साजरी करा दिवाळी!

Latest Marathi News Live Update : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणासंदर्भात एसआयटी/सीआयडीने अटक केलेल्या श्यामकानु महंता, सिद्धार्थ शर्मा आणि इतरांना आज न्यायालयात हजर करणार

SCROLL FOR NEXT