Growing demand for black rice from East Vidarbha across the country 
विदर्भ

काळ्या तांदळाचा भात कधी खाल्ला का; आरोग्यासाठी सर्वोत्तम, हे आहेत फायदे... 

दीपक फूलबांधे

भंडारा : पूर्व विदर्भ धान शेतीसाठी खास प्रसिद्ध आहे. येथे उत्पादित तांदळाला केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशात मागणी आहे. तांदळाच्या अनेक प्रजातींचे येथे उत्पादन घेतले जाते. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्मही आहेत. उकडीचे तांदूळ, बासमती, कोलम अशा अनेक प्रकारच्या तांदळाचे उत्पादन घेतले जाते. जेवणात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या भातामुळे तांदळाला सर्वत्र मागणी आहे. पूर्व विदर्भात भातालाच संपूर्ण अन्न मानले जाते. पांढऱ्या धानासोबतच आता शेतकरी काळ्या धानाकडे वळले आहेत. दुप्पट-तिप्पट नफा देणाऱ्या या तांदळाचा पेरा दिवसेंदिवस वाढत आहे. जाणून घेऊया या तांदळाविषयी 

काही दिवसांपूर्वी छत्तीसगड आणि नागालॅंडमध्ये पेरला जाणारा काळा तांदूळ आता विदर्भातही उत्पादित केला जातो. आरोग्यदायी असलेल्या या तांदळाला नागरिकांची मोठी मागणी असून, शेतकरीही आता पारंपरिक सोडून या नगदी पिकाकडे वळले आहेत. छत्तीसगडमध्ये आत्तापर्यंत शेतकरी पारंपरिक धानाची शेतीच शेतकरी करीत होते. परंतु दोन वर्षांपूर्वी डुकरी गाव विकास शिक्षण समिती नावाच्या सेवाभावी संस्थेने या दिशेने प्रयत्न सुरू केले. याची सुरुवात छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील करतला भागापासून करण्यात आली. पारंपरिक भात लागवड करण्यासोबतच छत्तीसगड राज्यामधील शेतकऱ्यांनी वेगळा आरोग्यदायी विचार करीत काळ्या तांदळाची शेती करण्यास सुरुवात केली. पहिल्याच वर्षी त्यांना या शेतीतून तिप्पट नफा मिळाला. भारतच नव्हे तर परदेशातून या तांदळाला चांगली मागणी आहे. 

अशी केली सुरुवात 

भंडारा येथील काही शेतकरी कृषिप्रदर्शनात गेले असता कुही (जि. नागपूर) येथील एका शेतकऱ्याने प्रदर्शनात आणलेल्या काळ्या तांदळाची माहिती मिळाली. कुतूहल म्हणून भंडारा येथील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून थोडे बियाणे आणले. मूळचे नागालॅंड येथील पीक असलेले बेला राईस (काळा तांदूळ) भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आर्श्‍चयाचा विषय ठरला होता. गणेशपूर भंडारा येथील शेतकरी यशवंत टिचकुले यांनी स्वत:च्या पाव एकरात गेल्या हंगामात पेरणी केली. परंतु, सिंचनाची पुरेशी सोय नसल्याने उत्पादन घटले. परंतु कृषी विभागातील अधिकारी आणि इतर शेतकऱ्यांमध्ये या पिकाविषयी कुतूहल निर्माण झाले. तसेच पेरणीबाबत उत्सुकता निर्माण झाल्याचे टिचकुले यांनी सांगितले. 

पहिला पेरा छत्तीसगड नागालॅंडमध्ये 

काळ्या तांदळाबाबत अधिक माहिती घेतली असता टिचकुले यांना समजले की छत्तीसगडमध्ये काळे धान पेरले जातात. काही वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्ये काही निवडक शेतकऱ्यांनी दहा एकरात काळ्या तांदळाची शेती केली. पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांचे काळे तांदूळ पांढऱ्या तांदळाच्या दुप्पट किमतीत विकले गेले. अशारीतीने शेतकऱ्यांचा काळे तांदूळ उत्पादित करण्याकडे कल वाढला. दुसऱ्याच वर्षी हीच शेती शंभर एकर एवढ्या भागात पसरली. जवळजवळ 25 टन काळ्या तांदळाचे उत्पादन झाले. या तांदळाचे पेटन्ट कोलकत्ता येथील एका कंपनीने खरेदी केले होते. आता जवळपास 112 शेतकरी 250 एकरात काळ्या तांदळाची शेती करीत आहेत. येथून 50 टन काळा तांदूळ उत्पादित होतो. बुखरी गाव विकास शिक्षण समिती नावाच्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत सोलखे यांनी सांगितले की, नाबार्डकडून मिळालेल्या या पद्धतीच्या ट्रेनिंग नंतर शेतकऱ्यांनी काळा तांदळाच्या शेतीला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे सोसायटी पॅकेट बनवून विकले जातात. शेतकऱ्यांना शंभर रुपये प्रतिकिलो एवढा नफा मिळत आहे. 


मोठ्या शहरांमध्ये पहिली पसंती 
 

बंगाल, दक्षिण भारतातील काही कंपन्यांनी काळ्या तांदळासाठी संपर्क केला आहे. मोठ्या शहरांमध्ये हा काळा तांदूळ चारशे रुपये किलो एवढ्या मोठ्या दरात विकला जातो. पांढरा तांदळाच्या तुलनेमध्ये हा तांदूळ फारच फायदेशीर आहे. स्थानिक बाजारांमध्ये जरी हा तांदूळ 150 रुपये प्रतिकिलो विकला जात असला तरी परंतु फ्लिपकार्टवर हा तांदूळ 399 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. काळ्या तांदळाची मागणीही मोठ्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कार्बोहाइड्रेटयुक्त असलेले हे काळे तांदूळ शुगर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना फायदेशीर आहेत. काळे तांदूळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाणदेखील नियंत्रित करता येते. त्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे ते पचण्यास उपयुक्त आहेत. सोबतच एंटीऑक्‍सिडेंट तत्त्व असल्याने ते डोळ्यांसाठी उपयोगी ठरते. 

आरोग्यदायी गुणांमुळे वाढती मागणी 

छत्तीसगड राज्यांमध्ये काळ्या तांदळाची शेती ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी या राज्यांमध्ये काळ्या तांदळाची शेती केली जात होती. परंतु, आता ही शेती आधुनिक पद्धतीने केली जात आहे. काळ्या तांदळाला छत्तीसगडमध्ये "करियाझिनी' नावाने ओळखले जाते. तांदळाची ही प्रजाती खूप पुरातन आहे. या ठिकाणी खोदकाम करताना हंड्यात धान्य मिळाल्याची अख्यायिका आहे. हा तांदूळ सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले जाते. काळ्या तांदळाच्या शेतीचे खूप चांगले परिणाम समोर येत आहेत. काळ्या तांदळाचे वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जात आहे. 90 ते 110 दिवसांमध्ये हा तांदूळ पिकून पिकून तयार होतो. काळ्या तांदळाचे उत्पादन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना विभागाकडून मदत केली जाते. येत्या काळामध्ये या तांदळाच्या अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे, जेणेकरून त्यांना याचा व्यावसायिक लाभ मिळेल. 


काळ्या तांदळाचे फायदे 

  • हा तांदूळ असा एकमेव आहे ज्यापासून बिस्कीट तयार केले जातात. 
  • या तांदळामधील फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते 
  • हृदयामधील धमन्यांमध्ये अर्थोस्क्‍लेरोसिस प्लेक फर्मेशनची शक्‍यता कमी करते 
  • लठ्ठपणा कमी करण्यासाठी काळे तांदूळ अतिशय फायदेशीर ठरतात 
  • या तांदळामध्ये असलेल्या फायबरमुळे अन्नपचन व्यवस्थित होते 
  • तांदळामधील एंटीऑक्‍सीडेंट तत्त्वामुळे त्वचा व डोळ्यांना फायदा होतो 

 
ठोकळ, परंतु आरोग्यदायी 
शेतातील धानाचे काळे पीक पाहण्यासाठी अनेक शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी येऊन गेले. मध्यम कालावधीत येणारे ठोकळ वाण आहे. चालू हंगामात पाऊण एकारात पीक घेत आहे. तांदळाचे दाणे काळपट लालसर रंगाचे आहेत. या तांदळाचा भात खाण्यास स्वादिष्ट, पचनास हलका आहे. यामुळे रक्तदाब, शूगर, हृदयरोग नियंत्रणात राहतो. तसेच कर्करोगाच्या टिश्‍यूंना वाढण्यास प्रतिबंध होतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 
-यशवंत टिचकुले,
गणेशपूर, भंडारा (मो. 9049278449) 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT