विदर्भ

जलजीवन मिशन आराखडा 527 कोटींचा

सकाऴ वृत्तसेवा

यवतमाळ जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी पाणीपुरवठा योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित झाल्या पाहिजेत, अशा सूचना दिल्या.

यवतमाळ : जलजीवन मिशनअंतर्गत येत्या मार्च 2024 पर्यंत देशातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ग्रामीण भागात प्रतिदिवस प्रतिमाणशी 40 लिटरऐवजी 55 लिटर गुणवत्तापूर्वक पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत जलजीवन मिशनच्या 527 कोटी रुपयांच्या आराखड्याला शुक्रवारी (ता.30) पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मंजुरी दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जलजीवन मिशन समितीची बैठक शुक्रवारी झाली, त्यात ही मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार बाळू धानोरकर, भावना गवळी, आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कोल्हे आदी उपस्थित होते.

जलजीवन मिशनच्या आराखड्यानुसार 687 गावांचा समावेश आहे. यासाठी 49 कोटी 67 रुपये, 311 गावांसाठी 309 कोटी, प्रपत्र क नुसार 543 गावांसाठी 120 कोटी 52 व 162 गावांत नवीन योजनांसाठी 48 कोटी 60 कोटी रुपयांच्या आराखड्याचा समावेश आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येकदिवशी प्रतिमाणशी 55 लिटर पाणी मिळाले पाहिजे. पाण्याचा नेमका सोर्स शोधून विभागाने काम करावे. या योजनेत सर्व गावे समाविष्ठ होईल, एकही गाव सुटता कामा नये, याची खबरदारी घ्यावी. यवतमाळ जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी पाणीपुरवठा योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित झाल्या पाहिजेत, अशा सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, मंजूर केलेल्या योजना त्वरित पूर्ण कराव्यात. टंचाई निर्मुलनासाठी योग्य नियोजन करावे. पुरवठादार काम करीत नसेल, तर संबंधितांना संपूर्ण देयके अदा करू नये. एक महिन्याच्या आत प्रलंबित कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT