Gun Firing sakal
विदर्भ

Wardha Crime : इर्षेतून आतेभावावर बंदुकीतून झाडल्या गोळ्या; एक गंभीर जखमी

इर्षेपोटी तरुणाने चुलत आतेभावाला निर्जनस्थळी नेत त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला.

सकाळ वृत्तसेवा

वर्धा - इर्षेपोटी तरुणाने चुलत आतेभावाला निर्जनस्थळी नेत त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या अंधाधुंद हल्ल्यात एक गोळी तरुणाच्या मांडीला लागली तर दुसरी जवळून गेली. दत्तपूर वळणमार्गावर सोमवारी (ता. २९) रात्री आठ वाजताच्या सुमारास हा थरार घडला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी युवकावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर दोन तासांतच हल्लेखोर तरुणाला अटक करीत बंदुक जप्त करण्यात आली. हर्षल लंकेश झाडे असे जखमीचे तर राहुल हरिश्चंद्र वाघमारे (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आलोडी येथील मूकबधिर विद्यालय परिसरातील रहिवासी जखमी हर्षल झाडे हा आरोपी राहुलच्या आत्याचा मुलगा आहे. सुरवातीच्या काळात दोघांची चांगली मैत्री असतानाच गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये खटके उडत होते.

यातूनच हर्षलने राहुलच्या घरी ये-जा बंद केली होती. सोबतच हर्षल प्रगती करीत असल्याने तो बेचैन होता. यातच निर्माण झालेल्या इर्षेतून सोमवारी रात्री राहुल हर्षलच्या घरी गेला व त्याने साखरेचे पोते पडले असून उचलण्यासाठी मदत कर, या बहाण्याने दत्तपूर वळणमार्गावर नेले.

तेथे पोहोचताच राहुलने गाडीला अडकविलेल्या बॅगमधून देशी बनावटीचे पिस्तूल काढून हर्षलवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यात एक गोळी हर्षलच्या मांडीला लागली, बचाव करण्याकरिता जखमी अवस्थेत त्याने पळ काढला. गोळीबार केल्यानंतर राहुलही फरार झाला. गुन्हे शाखा आणि सेवाग्राम पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. हर्षलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याचे बयान नोंदविले.

तपासादरम्यान घटनास्थळावरून बंदुकीच्या राऊंडचे एक केसही जप्त करण्यात आले. पथकातील पोलिस शिपाई सचिन इंगोले यांना मिळालेल्या आधारे त्यांनी राहुल वाघमारे याला वर्धा येथून अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूलही जप्त करण्यात आले.

घटनास्थळाला पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी भेट देऊन निर्देश दिले. पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी यांच्या नेतृत्वात सचिन इंगोले, प्रमोद पिसे, हमीद शेख, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, अरविंद इंगोले, रामकिसन इप्पर यांनी ही कारवाई केली.

पोते उचलण्याच्या बहाण्याने नेले घरून

आरोपी राहुल आतेभाऊ हर्षलशी प्रथम सख्य होते. मात्र, हर्षल करीत असलेल्या प्रगतीतून त्याच्या मनात इर्षा निर्माण झाली यातूनच त्याने पोते उचलण्याच्या बहाण्याने दत्तपूर वळणमार्गावर नेले. तेथे अंधाधुंद गोळीबार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: फसवणूक, रम्मी व्हिडीओ, वादग्रस्त वक्तव्य अन् कोर्टाचा दणका! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, पण हे न मिटणारे डाग...

किल्लेदारांच्या अपघातामागचा खरा सूत्रधार अखेर उघड होणार! ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक आनंदी पण....

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

दुर्दैवी घटना! 'अकोलेत विहिरीत पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू', नातेवाईंकाकडून घातपाताचा संशय..

मेस्सीवर कोट्यवधींची उधळण, भारतीय फूटबॉलकडे पाठ... गुंतवणुकीची कुणाची इच्छा नाही; भारताच्या कर्णधारानं व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT