file photo
file photo 
विदर्भ

पोलिस व्हॅनमध्ये कुख्यात गुंडाचा "टिक टॉक'

सकाळवृत्तसेवा

नागपूर : एका कुख्यात तडीपार गुंडाने पोलिस व्हॅनमध्ये बसून "टिक टॉक' व्हिडिओ तयार केल्याचे व्हायरल झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय वाहनाचा गैरवापर केल्याने कोराडी पोलिसांनी आज गुंड मोबीनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे व्हॅनचालक व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.
सैयद मोबीन अहमद (रा. संघर्षनगर, टिपू सुलतान चौक) हा चामा गॅंगचा प्रमुख आहे. याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या तडीपार आहे. काही दिवसांपूर्वी मोबीनचा भाऊ सेबू याला यशोधरानगर पोलिसांनी वाहनचोरीच्या आरोपात अटक केली होती. चामा गॅंग ही मोठमोठी वाहने चोरी करतात. या वाहनांचा उपयोग जनावरांच्या अवैध वाहतुकीसाठी करण्यात येतो. पोलिसांनी वाहन पकडल्यास चालक वाहन सोडून पळ काढतो. त्यामुळे चामा टोळीचे कोणतेही नुकसान होत नाही. मोबीनविरुद्ध वरोरा, वणी आणि गिट्‌टीखदान पोलिस ठाण्यात खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मोबीनने यापूर्वी पोलिसांवरही हल्ले केले आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोबीनचे गुंड गुरे चोरण्याची कामे करतात. ती गुरे आदिलाबाद येथे कत्तलीसाठी विकल्या जातात. आतापर्यंत मोबीनची अनेक वाहने वणी, राजनांदगाव येथील पोलिस ठाण्यात जप्त आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबीन कुख्यात असून त्याच्यापर्यंत अद्याप पोलिस पोहोचले नाहीत. मात्र, काही पोलिस कर्मचाऱ्यांशी त्याचे "अर्थपूर्ण' संबंध आहेत. मोबीनवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड पाहता डीसीपी हर्ष पोद्दार यांनी त्याला दोन महिन्यांपूर्वीच तडीपार घोषित केले होते. मात्र, आजपर्यंत आदेशाचे पालन झाले नाही.
कुख्यात मोबीनच्या व्हिडिओचे प्रकरण पोलिस उपायुक्‍तांनी गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाचा तपास एसीपी कार्यकर्ते यांना देण्यात आला आहे. सध्या व्हिडिओची सत्यता पडताळणी आणि प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांची भूमिका या संदर्भात एसीपी तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यासमोरच बनविला व्हिडिओ
मोबीनने कोराडी पोलिस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या सीआर मोबाईल वाहन क्र. (एमएच 31, एजी 9826) मध्ये बसून व्हिडिओ बनविला. व्हिडिओ बनविणारा अन्य साथीदारसुद्धा होता. "अपून को बोलते मियॉं भाई...' आणि "गॅंग लेकर आनेवाला गॅंगस्टर... अकेला आता हैं वो मॉनस्टर' असे संवादही त्याने वापरले आहेत. एका गुंडाकरवी पोलिस वाहनाचा वापर झाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केल्या जात आहे.
कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल
कोराडी पोलिस ठाण्यातील सीआर मोबाईल व्हॅनमध्ये गुंड मोबीनने व्हिडिओ बनविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोराडीचे ठाणेदार यांनी वाहनावरील चालक पोलिस कर्मचाऱ्यांचा कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल पोलिस उपायुक्‍तांना पाठविल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT