विदर्भ

यवतमाळात खुल्या जागांवर जीम-जॉगिंग ट्रॅक; ११ प्रस्तावांवर मंजुरीची मोहोर

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शहरातील खुल्या जागांवर ओपन जीम व जॉगिंग ट्रॅक (Gym and jogging track) उभारले जाणार आहेत. एकूण ११ प्रस्तावांवर मंजुरीची (Approval of 11 proposals) मोहोर उमटविण्यात आली असून, ७७ लाखांच्या निधीमधून ११ ठिकाणी साहित्य खरेदी केले जाणार आहे. (Gym-and-jogging-tracks-in-open-spaces-at-Yavatmal)

यवतमाळ नगरपालिकेचे नगरसेवक प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती यांनी या योजनेचा लाभ शहरातील जनतेला व्हावा या दृष्टिकोनातून पाठपुरावा केला. याबाबत सर्वप्रथम त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन अवगत केले. तसेच ओपन जीम व जॉगिंग ट्रॅकची कामे करण्याबाबत सूचित केले. क्रीडा व क्रीडांगण अनुदान निधीअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

खुल्या मैदानाचा नमूना आठ ‘अ’, नकाशा, नगरपालिकेचा ठराव आदी कागदपत्रांची पूर्तताही करून घेतली. त्याचेच फलित म्हणून भोसा येथील संजय गांधीनगर, रुक्मिणीनगर, सव्वालाखे ले-आऊट, लोहारा येथील मामानगरी, सुर्योदयनगर, शुभमनगर, डेहणकर ले-आऊट या ठिकाणी धावणपथ तयार करण्याच्या कामासाठी प्रत्येकी सात लाख रुपये मंजूर झाले आहेत. भोसा येथील संजय गांधीनगर, मालाणी सोसायटी, मंगेशनगरमध्ये विविध खेळाची प्रमाणित क्रीडांगण तयार करण्याची कामे केली जाणार आहेत. ही सर्व कामे ७७ लाख रुपये खर्च करून पूर्ण केली जाणार आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे कर्तव्य ठरते. क्रीडा व क्रीडांगण अनुदान निधीअंतर्गत ओपन जिम व जॉगिंग ट्रॅक उपलब्ध होत असल्याने पाठपुरावा करून ११ प्रस्ताव मंजूर करून घेतलेत. एक ते दोन दिवसांत ७७ लाखांच्या निधीतून क्रीडा साहित्य खरेदीची कामे करण्यात येणार आहेत.
- प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, नगरसेवक, यवतमाळ

(Gym-and-jogging-tracks-in-open-spaces-at-Yavatmal)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT