Halba-Agitation
Halba-Agitation 
विदर्भ

आंदोलकास बळजबरीने केले मेयोत दाखल

सकाळवृत्तसेवा

नागपूर - हलबा क्रांती सेनेतर्फे १५ नोव्हेंबरपासून अनिश्‍चितकालीन उपोषणाला बसलेल्या कमलेश भगतकर यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. यास विरोध केल्याने पोलिसांनी बळाचा केल्याचा आरोप करून हलबा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. त्यामुळे गांधीबाग परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. आता भगतकर यांच्या जागी समाजाचे ज्येष्ठ नागरिक विजय मौंदेकर उपोषणाला बसले आहेत. 

हलबा समाजाला आरक्षण द्यावे याकरिता हलबा क्रांती सेनेच्यावतीने जगदीश खापेकर यांच्या नेतृत्वात गांधीबाग उद्यान परिसरातील रा. बा. कुंभारे यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केले. पहिल्या दिवसापासून कमलेश भगतकर या तरुणाने अनिश्‍चितकालीन उपोषण सुरू केले होते. त्याच्या समर्थनात क्रांती सेनेतर्फे वेगवेगळे आंदोलनही करण्यात आले. दरम्यान, कमलेश यांची प्रकृती खालावत चालली होती. तरीही त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला होता.

त्यामुळे पोलिसांनी बुधवारी (ता.२१) सातव्या दिवशी सकाळी कुणीही कार्यकर्ते नसल्याचे बघून सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांना उचलून मेयो रुग्णालयात दाखल केले. कमलेश यांना नेताच पन्नासावर पोलिसांचा फौजफाटा आला होता. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच शंभरच्यावर तरुण कार्यकर्ते येथे गोळा झाले. सरकार आणि पोलिस कारवाईच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. बुधवारी ईद असल्याने तरुणांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

भगतकरांचे आंदोलन, मौंदेकरांचे उपोषण
पोलिसांनी कमलेश भगतकर यांना उचलून रुग्णालयात दाखल केले असले तरी त्यांनी  रुग्णालयातही असहकार दर्शवित उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. सरकारने पोलिसांच्या मदतीने दडपशाही करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, हलबा समाज या दडपशाहीला घाबरत नाही. शरीरात शेवटचा श्‍वास असेपर्यंत मी समाजाच्या न्यायासाठी लढा  देणार. माझ्यानंतरही समाजाचा झेंडा उचलण्यासाठी तरुण तयार आहेत. सुटी झाल्यानंतर मी पुन्हा आंदोलनात सहभागी होऊन उपोषण सुरू ठेवणार, असा इशारा भगतकर यांनी दिला. दुसरीकडे, सातव्या दिवशी पोलिसांनी कमलेश यांचे उपोषण थांबविल्यानंतर त्यांच्या जागी समाजातील ज्येष्ठ नागरिक विजय मौंदेकर यांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. कमलेश भगतकर यांनी जो विडा उचलला तो आम्ही पुढे नेऊ आणि आंदोलन असेच सुरू ठेवू, असे मनोगत मौंदेकर यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT