विदर्भ

डिजिटल युगातही हळदीकुंकवाचे महत्त्व कायम 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, अजूनही स्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक म्हणजे मकरसंक्रांती. संक्रांत म्हणजे स्रियांचा सण, हळदीकुंकू कार्यक्रम आणि वाणांची लूट. काळानुरूप वाणांच्या वस्तू बदलल्या असल्या तरी, अजूनही हळदीकुंकवाचे महत्त्व मात्र अबाधित असल्याची प्रतिक्रिया मकरसंक्रांतीनिमित्त महिलांनी "सकाळ'कडे व्यक्त केल्या. 

मकरसंक्रांतीनिमित्त आसपासच्या तसेच परिचयाच्या स्त्रियांना घरी बोलावून हळदीकुंकू आणि तिळगूळ देऊन वाण वाटण्याची प्रथा आजही सुरूच आहे. फरक केवळ एवढाच की आधुनिक युगात ही प्रथासुद्धा आधुनिक झाली आहे. नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला मकरसंक्रांतीनिमित्त दोन क्षण विरंगुळ्याचे मिळाल्याने त्यासुद्धा यात उत्साहाने सहभागी होत असतात. घर आणि नोकरी अशी दुहेरी कसरत पेलताना बरेचदा तिला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. अशावेळी वर्षातून एकदा तरी येणारी मकरसंक्रींत त्यांना विरंगुळ्याचे चार क्षण देण्यासाठी मदतीचा हात देणारी ठरते. घरोघरी होणाऱ्या या समारंभाला आता सार्वजनिक समारंभाचे रूप आले आहे. सार्वजानिक हळदीकुंकू केले जात असल्याने वेळही वाचतो आणि परंपराही जपली जाते. अनेक महिला मंडळ हळदीकुंकवाच्या निमित्ताने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सामाजिक उपक्रमही राबवतात. पूर्वी हळदीकुंकवासोबतच वाण म्हणून मातीचे सुगडे, हिरव्या बांगड्या, काळे मणी, जोडवे ही सौभाग्य लेणी दिली जात होती. आता यात बराच बदल झाला आहे. प्लॅस्टिक व स्टीलच्या वाट्या, प्लेट ,चमचे, प्लॅस्टिकच्या बरण्या, डबे तसेच पावडरचे डबे, शॉम्पूची पाकीटं, साबण, रुमाल यासारख्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू देण्याकडे स्त्रियांचा अधिक कल दिसून येतो. शहरातील महाल, सीताबर्डी, इतवारी, सक्करदरा, गोकुळपेठ या भागात वाणाच्या सामानांची दुकाने थाटण्यात आली आहेत. स्टीलच्या वस्तू 100 रुपयांपासून 500 रुपये डझनापर्यंत आणि प्लॅस्टिकचे वाण 50 ते 80 रुपयांपासून 200 ते 400 रुपयांपर्यंत विक्रीला आहे. लहान मुलींसाठी छोट्या टोपल्या, डबे वॉटरबॅग यासारख्या वस्तू बाजारात विक्रीला आहेत. 

पूर्वी चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते. चार भिंतीच्या आत कोंडल्या गेलेल्या स्त्रियांना हळदीकुंकवासाठी बाहेर पडता यायचे. आता परिस्थितीत बदलली असली तरी, हळदीकुंकवाच्या प्रथेला मात्र अजूनही तितकेच महत्त्व आहे. 
- वेणू भोयर, मानेवाडा. 

नोकरीनिमित्त रोजची धावपळ असल्याने सोसायटीतील इतर महिलांशी भेट होत नाही. परंतु, मकरसंक्रांतीनिमित्त खास सुटी घेऊन आम्ही सर्व महिला सोसायटीत सामूहिक हळदीकुंकू कार्यक्रम घेतो. 
- गायत्री गिऱ्हे, लक्ष्मीनगर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT