How to Check Your Name in the Final List of ladki bahin yojana : २०२४ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं. या योजनेला आता जवळपास एका वर्षांचा कालावधी पूर्ण होतो आहे. मात्र, या योजनेत काही अपात्र महिलांनी अर्ज केल्याचं पुढे आलं आहे. त्यानुसार सरकारने महिलांच्या अर्जांची छानणीही सुरू केली आहे.