विदर्भ

मुख्याध्यापकांनो, ग्रामपंचायतचा कारभार सांभाळा!

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर आहेत. परिणामी ग्रामपंचायतचा कारभार ठप्प पडला असून ग्रामस्थांची गैरसोय सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेने थेट जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकांकडे ग्रामपंचायतचा कारभार सोपविण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षक संघटनांनी आदेशाला विरोध दर्शविला आहे. शिक्षकांनी शाळा सांभाळायची की ग्रामपंचायत असा सवाल मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित करीत आहेत.
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांचे 22 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. ग्रामपंचायतशी संबंधित सर्वच कामे खोळंबली असून त्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. जिल्ह्यात 13 तालुक्‍यांत एकूण 768 ग्रामपंचायती आहेत. गेल्या 20 दिवसांपासून सर्वच ग्रामपंचायत कार्यालयांशी संबंधित सर्वच कामे थांबली आहेत. अशा परिस्थितीत गावकऱ्यांची गैरसोय थांबविण्यासाठी मुख्याध्यापकांनी तात्पुरता कार्यभार सांभाळावा अशी जि.प. प्रशासनाची अपेक्षा असून त्यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांसह कृषी अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, शाखा अभियंता, आरोग्य सेवक, कृषी विस्तार अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतची तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. आदेश धडकताच पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या बहुसंख्य प्राथमिक शाळा द्विशिक्षकी आहेत. दोनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यासह शाळेचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. अशात एक शिक्षक ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यास शाळेतील काम रखडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Radhanagari Dam Gate Opens : राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा उघडला; धरणातून 2628 क्युसेक विसर्ग, घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT