file photo
file photo 
विदर्भ

विदर्भात सर्वदूर संततधार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सुमारे महिनाभर डोळे वटारलेला वरुणराजा पुन्हा मेहेरबान झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून विदर्भात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसाने गडचिरोलीतील शेकडो गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. दुसरीकडे मेळघाटमधील 38 गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील सिपना नदीला आलेल्या महापुराचा फटका महावितरणला बसला असून, या पुरात महावितरण 11 केव्ही विद्युत वाहिनीचे 10 खांब आणि एक नवीन डीपीचे स्ट्रक्‍चर वाहून गेले आहे. परिणामी या वाहिनीवरील 38 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. विशेष म्हणजे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज करण्यात आली असली तरी संततधार पाऊस सुरू असल्याने दुरुस्ती कार्यात अडथळा येत आहे. मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने तसेच मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे मेळघाटातील नद्यांना महापूर आलेला आहे. सिपना नदीला आलेल्या महापुराचा दबाव एवढा जास्त होता की महावितरण कडाव उपकेंद्रातून निघणाऱ्या पाटीया- वैरागड या 11 केव्ही विद्युत वाहिनीचे काकरमल आणि उतावलिया परिसरातील 10 वीजखांब व एका नवीन डीपीचे स्ट्रक्‍चर वाहून गेले. परिणामी या वाहिनीवरील 38 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यासाठी एका खासगी एजन्सीचीही मदत घेण्यात आली आहे. पण, परिसरात पावसाचे प्रमाण जास्त आहे. शिवाय खड्डे खोदून नवीन खांब उभारण्यासाठी पाऊस थांबण्याची किंवा कमी होण्याची वाट बघावी लागणार आहे.
लाल नाल्यातून 109 क्‍युमेक्‍स पाण्याचा विसर्ग
वर्धा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने लावलेली हजेरी आल्हाददायक ठरली. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर मरणासन्न असलेली पिके डोलू लागली. समुद्रपूर तालुक्‍यातील लाल नाला धरण पूर्ण भरल्याने धरणाचे पाच दरवाजे मंगळवारी (ता. 30) 35 सेंमीने उघडण्यात आले. या धरणातून 109 क्‍युमेक्‍स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे या धरणाकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने या भागातील नदी, नाले फुगल्याने काही गावांचा संपर्क तुटला. तर मंगरूळ गावात पाणी शिरल्याने नागरिकांची पंचाईत झाली.
चंद्रपूर शहरालगतच्या आठ गावांचा संपर्क तुटला
चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा, इरई, हुमा या नद्या फुगल्या असून, नालेही ओव्हरफ्लो झाले आहेत. चंद्रपूर-दाताळा मार्गावरील इरई नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहेत. त्यामुळे देवाडा, दाताळा यासह सहा गावांचा संपर्क तुटला आहे. चिमुरात उमा नदी, सातनाला ओसंडून वाहत असल्याने ठक्कर कॉलनीतील झोपडपट्टी, केसलापूर भागात पाणी साचले आहे. ब्रह्मपुरी तालुक्‍यातील आवळगाव- गांगलवाडी मार्गावरील नाल्याने पूर आल्याने नागरिक जीव धोक्‍यात घालून ये-जा करीत आहे. पावसाने जिल्ह्यातील अनेकांच्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.
तीनशे नागरिकांना हलविले सुरक्षितस्थळी
गडचिरोली : पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड येथील सुमारे 300 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. आलापल्ली-भामरागड मार्ग अजूनही बंद आहे. त्यामुळे भामरागड व अहेरी तालुक्‍यातील सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे आरमोरी तालुक्‍यात दोन, तर गडचिरोली तालुक्‍यात एक व्यक्ती जखमी झाला. चामोर्शी तालुक्‍यात चार जनावरांचा मृत्यू झाला. भामरागड तालुक्‍यातील दूरध्वनीसेवा व वीजपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प आहे. आरमोरी तालुक्‍यातील वनखी येथील दुधराम जांभुळे यांच्या घरावर दुसऱ्या व्यक्तीचे घर कोसळल्याने दुधराम जांभुळे व त्यांचा मुलगा जखमी झाले. पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरले असून, तेथील दुकानदार व रहिवाशांचे नुकसान झाले आहे. तेथील सुमारे तीनशे पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात मुक्‍काम ठोकल्याने अनेक नद्या फुगल्या आहेत. पाचव्या दिवशी मंगळवारी (ता. 30) पावसामुळे रोवणीच्या कामाला लागलेला शेतकरी आनंदला असला, तरी शहरी भागात सततच्या पावसाच्या रिपरिपीने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT