भोकरदन तालुक्यातील राजुरपासून जवळच असणाऱ्या तपोवन तांडा व चनेगाव शिवारा दरम्यान आज (सोमवारी) एका खाजगी कंपनीच्या हेलिकॉप्टरचे दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
अचानक शेताच्या शिवारात हेलिकॉप्टर उतरल्यामुळे आसपासच्या गावकऱ्यांची एकच धांदल उडाली. सध्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे.
हेलिकॉप्टर मुंबई येथील मल्होत्रा हेलिकॉप्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे असून छत्रपती संभाजी नगर येथून काही वेळापूर्वी उड्डाण केले होते. नागपूरकडे रवाना होत असताना हेलिकॉप्टरच्या रडार वरील पॅरामीटर्स चुकीचे दाखवत असल्यामुळे पायलटला तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आला. प्रसंगावधान राखत मोकळ्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवले. सुदैवाने पायलट व दोन कर्मचारी सुखरूप आहेत.
राजूर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी नाव घेऊन माहिती घेतली. पायलटने त्यांना हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडावरबद्दल सांगितले. काही वेळाने दुरुस्तीनंतर हेलिकॉप्टर तासाभरानंतर नागपूरकडे रवाना झाले. दुसरीकडे सोशल मीडियावर हेलिकॉप्टरच्या फोटोवरून अफवांचा एकच बाजार उठला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.