file photo
file photo 
विदर्भ

गावठी दारूची विक्री करणारे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

देवलापार (जि.नागपूर) :  विधानसभा निवडणुकीमध्ये वापर करण्याचे उद्देशाने दारूसाठा करून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच गावठी दारूचा पुरवठा करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी छापा घालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 15 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पिंडकापार येथील वनविभागांतर्गत जंगल शिवारात असलेल्या बावनथडी धरणालगत वाहत जाणाऱ्या नाल्याजवळ तीन ते चार जण हातभट्टी लावून मोहाफुलाची गावठी दारू काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच देवलापार पोलिसांनी घटनास्थळी छापा घातला. अवैधरीत्या हातभट्टी लावून मोहफुलाची दारू काढणारे चौघे पोलिसांना पाहून जंगलात पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. दिनेश कोडवते (वय 30, पिंडकापार), सूर्यभान खंडाते (वय 28, गर्रा बघेडा, ता. तुमसर) यांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित आरोपींनी जंगलाचा फायदा घेत पळ काढला. आरोपींच्या ताब्यातून मोहफूल हातभट्टीची गावठी दारू गाळण्याच्या उपयोगाचे 15,700 लिटर मोहफूल रसायन सडवा आणि 2900 लिटर मोहफूल हातभट्टीची गावठी दारू असा एकूण 15 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. प्रवीण बोरकुटे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT