विदर्भ

भुकेल्या जिवात शोधतात ‘ते’ ईश्‍वर, अल्लाह

रूपेश खैरी

वर्धा - आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांमध्ये ईश्‍वर अन्‌ अल्लाहाचे रूप पाहून भुकेल्या जिवाला दोन घास भरविण्याचा उपक्रम वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अन्नदान समितीच्या माध्यमातून सुरू आहे. सामाजिक सद्‌भावनेचा हा उपक्रम गांधी जिल्ह्याच्या नावलौकिकाला साजेसा असाच आहे. 

अलीकडे माणूस रंगाने ओळखू लागला आहे. मात्र, पोटाला जात, धर्म असा भेद नसतो. भूक लागली की, त्याला हवे असतात दोन घास. वर्ध्यात हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या युवकांनी एकत्र येत अशाच भुकेल्यांना दोन घास भरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात येणारा रुग्ण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतो. त्याला औषधोपचाराकरिता रुग्णालयात दाखल केल्यानंतर शासनाच्या योजनेत त्याला दोन घास मिळतात. पण, त्याच्यासोबत असलेल्या नातेवाइकांना पैसे खर्च करून आपली भूक भागवावी लागते. हे प्रत्येकाला शक्‍य होत नाही. 

रुग्णालयात आलेल्या रुग्णाच्या नातलगांची ही अडचण ओळखून वर्ध्यातील आबीद मामू, यशवंत वसू, माणिकचंद बारई, हरीश खाडे, नंदी अनवानी आणि गुड्डू अली या युवकांनी एकत्र येत एक अन्नदान समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून दररोज दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमित अन्नदान सुरू आहे. दररोज दोनशे ते तीनशे नागरिकांना पुरेल एवढे अन्न त्यांच्याकडून पुरविण्यात येते. याकरिता कुठलाही मोबदला घेतला जात नाही. अन्नदान समितीत असलेले सदस्य आपापसांत रक्‍कम गोळा करून खर्चाचा भार उचलतात. यात कोणी स्वत:हून मदत केल्यास ती स्वीकारण्यात येते. 

रुग्णांच्या नातलगांना पुरविण्यात येत असलेले अन्न शिजविण्याकरिता रुग्णालयात जागा नसल्याने समिती सदस्य मानिकचंद बारई यांच्या घरी स्वयंपाक करून तो एका ऑटोत रुग्णालयात आणला जातो. येथे दररोज दुपारी एकच्या सुमारास अन्नदानाला प्रारंभ होतो.

आठवड्याचा मेन्यू
या समितीकडून जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातलगांना आठवड्यातील तीन दिवस मसाले भात आणि चार दिवस भात, भाजी-पोळी पुरविण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT