file photo 
विदर्भ

ऑगस्ट महिण्यातील सुट्यांनी सोमनाथ फुलले

विनायक रेकलवार

मूल (जि. चंद्रपूर) : सलग आलेल्या सुट्या, कोसळणारे धबधबे आणि श्रावण महिना असा हा तिहेरी संगम ऑगस्ट महिण्यात साधल्या गेल्याने सोमनाथ देवस्थान पर्यटकांनी चांगलेच फुलले आहे. येथील निसर्गातील अनमोल ठेवा डोळ्यात साठविण्यासाठी आणि धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले सोमनाथकडे वळत आहेत.
मूलपासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या सोमनाथ येथे शिवलिंग असलेले प्राचीन देवस्थान आहे. काळ्या पाषाणाचे हे शिवलिंग भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मंदिराजवळूनच वाहणारा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणात मुख्य भर घालत आहे. संततधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धबधब्याचा आवाज परिसरात घुमत असल्याने या नैसर्गिक वातावरणात मंगल आणि आनंदाचे सूर उमटत आहेत .
श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे पूजाअर्चा केली जाते. भव्य काळे पाषाण आणि त्यातून वाहणारा धबधबा, डोंगरदऱ्या, पशुपक्षी, वेली, पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवी वनराई, आमराई, गुहा आणि गायमुख आदी सर्वच घटक पर्यटकांना मोहून टाकतात . त्यामुळे वनव्याप्त नैसर्गिक सौंदर्य लूटण्यासाठी, शिव लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि धबधब्याच्या पाण्यात आंघोळीचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पाऊले सोमनाथ कडे वळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar AI Video: अजित पवारांच्या आवाजात खोटा एआय व्हिडीओ केल्यास कडक कारवाई; राष्ट्रवादी काँग्रेसचं पत्र

Mohammad Shami : मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ!, आता पत्नीने ठोठवला सुप्रीम कोर्टाचा दरवाजा

IND vs NED, T20 WC: इशान किशनची 'दुर्दैवी' विकेट! भारताच्या दोन्ही ओपनरचा 'दांडा' उडवणारा Aryan Dutt कोण?

Latest Marathi News Live Update : रोहितची अस्वस्थता साहाजिकच, सर्वांनाच अपघाताचं उत्तर हवय – सुप्रिया सुळे

IND vs NED, T20 WC: अभिषेक शर्माचा 'गोंधळ'! भलत्याच खेळाडूची जर्सी घालून फलंदाजीला आला अन् आजही भोपळ्यावर माघारी परतला

SCROLL FOR NEXT