Human Milk Bank Sakal
विदर्भ

Human Milk Bank : चिमुकल्यांची भूक मिटणार! परतवाडा शहरात मातेच्या दुधाची बँक

आईचे दुध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असले तरी काही मातांना विविध कारणांमुळे स्तनपान देणे शक्य होत नाही. अशा बालकांसाठी परतवाडा शहरात मानवी दुध बँक उभारण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अचलपूर - आईचे दुध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असले तरी काही मातांना विविध कारणांमुळे स्तनपान देणे शक्य होत नाही. अशा बालकांसाठी परतवाडा शहरात मानवी दुध बँक उभारण्यात आली आहे. त्यामाध्यमातून चिमुकल्यांना आईचे दुध मिळणार आहे.

डॉ. सुरेश ठाकरे बहूद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रनील ठाकरे बालरुग्णालयात विजयचंदजी स्वरूपचंदजी बरडिया स्मृतिप्रित्यर्थ माता अमृत दुग्ध पेढी (ह्यूमन मिल्क बँक) सुरू करण्यात आली आहे. या मानवी दूध बँकेचे उद्घाटन डॉ. सतीश तिवारी यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला डॉ. राजेश बूब, डॉ. प्रतिभा काळे, डॉ. प्रतीक्षा, उषा ठाकरे, डॉ. इंद्रनील ठाकरे, डॉ. अंजली ठाकरे, डॉ. झाकीर खान, डॉ. अरुणा गुल्हाने, डॉ. दुधे, डॉ. स्वप्नील मडगे, डॉ. मनीष अग्रवाल, डॉ. रावत, डॉ. पंजई, डॉ. बद्रुनिसा यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय रोटरी क्लबचे अध्यक्ष राजकुमार बरडिया, सचिव गौरव बंसल, सचिव विवेक लष्करी, इनरव्हीलच्या अध्यक्ष प्रीती भंसाली, वरिष्ठ रोटेरियन महाजन, डॉ. राजेंद्र भंसाली, डॉ. दीपक गुल्हाने, आकाश भंसाली, कमल केजडीवाल, श्याम मालू, महेंद्र राठी, संजय अग्रवाल, पंकज मालवीय, राजेंद्र अग्रवाल, परेश भंसाली, राकेश अग्रवाल, राम ककरानिया, सुनील बरडिया, ऋषी शहा, संजोग वैष्णव आदी मान्यवर उपस्थित होते. स्तनपानाचे व आईच्या दुधाचे महत्त्व तर सर्वज्ञात आहे. आईच्या दुधामुळे बाळाच्या पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. आईच्या दुधाची तुलना कृत्रिम दुधाशी होऊच शकत नाही.

वंचित चिमुकल्यांना मिळणार दूध

आईला दूध कमी येण्याची समस्या शहरी भागात जास्त आहे.एकीकडे ही परिस्थिती असताना ग्रामीण स्त्रियांमध्ये जास्त दूध येत असल्यामुळे स्तन कडक होणे, दुखणे अशा समस्या दिसून येतात. म्हणून बऱ्याचदा स्त्रिया हे जास्तीचे दूध काढून फेकून देतात.

यासाठी ह्यूमन मिल्क बँकेच्या माध्यमातून हा असमतोल दूर करून दूध कमी येणाऱ्या व दूध जास्त येणाऱ्या दोन्ही मातांना लाभ होऊ शकतो. या दूध बँकेमुळे काही कारणांमुळे आईच्या दुधापासून वंचित राहावे लागत असलेल्या चिमुकल्यांना दूध मिळणार आहे. त्यामुळे ही शहरातील पहिली मानवी दूध बँक वरदान ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT