police
police 
विदर्भ

पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हुंडीवाले यांची हत्या 

सकाळवृत्तसेवा

अकोला : ‘माझ्या जीवित्वाला धोका असून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी’ या आशयाची तक्रार मृतक किसनराव हुंडीवाले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर अाणि खदान पोलिस ठाण्यात दोन वेळा केली होती. अशा तक्रारी करूनही याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. यामुळे किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाल्याचा अारोप मृतकाच्या कुटुंबीयानी केला अाहे. 

मृतक किसनराव हुंडीवाले यांनी ६ एप्रिल २०१८ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी त्यांच्यासह कुटुंबातील व्यक्तींच्या जीवाला श्रीराम गावंडे व त्यांच्या मुलांकडून धोका असल्याचे नमूद केले होते. पोलिसांनी ही तक्रारच गांभीर्याने घेतली नाही. ती तक्रार जर गांभीर्याने घेतली असता आणि आरोपींना तेव्हाच समज दिली असती तर आपल्या वडिलांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया किसनराव यांच्या मुलांनी दिली अाहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षकांना अशी केली होती तक्रार 

श्रीराम गावंडे हे जिल्ह्यात पोलिस खात्यात नोकरीवर होते. नंतर पीएसआय म्हणून अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांचे अाणि किसनराव हुंडीवाले यांच्यात वाद सुरू होता. यामुळे किसनराव हुंडीवाले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीत ‘या व्यक्तीने अवैध मार्गाने व पोलिस खात्यात राहूनही दहशतीचे बळावर अवैध संपत्ती बाबत चौकशी व्हावी व योग्य कायदेशीर कारवाई व्हावी, करीता अॅन्टी करप्शन ब्युरोला सर्व ज्ञात संपत्तीचे विवरण देवून तक्रार केली आहे. मी अॅन्टी करप्शन खात्यामध्ये त्यांचे विरुद्ध तक्रार केल्यामुळे तो अत्यंत चिडला आहे.

आपली ऐवढी ओळख व दहशत असतानाही आपल्या विरुद्ध तक्रार केलीच कशी? या अविचाराने तो ग्रासित असून, त्याचेकडून किंवा त्याचे साथीदारांकडून तसेच त्यांचे हस्तकांकडून माझेवर किंवा माझे कुटुंबीयावर कधीही तो घातक हल्ला किंवा जीवघेणी कारवाई करू शकतो, मी व माझी मुले शेतात किंवा व्यापार सौद्याकरीता गावी परगावी व शहरात व सामाजिक कार्या करीताही फिरत असतो. मला व माझ्या मुलांना, कुटुंबीयाना श्रीराम गावंडे, त्याची मुले व कुटुंबीयाकडून कधीही धोका होवू शकतो, करिता मला त्याचेपासून सुरक्षा देण्यात यावी, तसेच तो आमचे विरोधात खोट्यानाट्या तक्रारी किंवा गुन्हे दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही, माझे व माझे कुटुंबीयाचे जीवितांचे काहीही बरे वाईट झाल्यास त्यास श्रीराम गावंडे हेच जबाबदार राहील’, असे नमुद अाहे. 

खदान पोलिसांनाकडेही केली होती तक्रार 
८ नोव्हेंबर २०१८ रोजी किसनराव हुंडीवाले यांनी खदान पोलिसांकडे एक तक्रार केली होती. त्यात त्यांनी श्रीराम गावंडे, गोलू उर्फ सूरज प्रल्हाद गावंडे, छोटू उर्फ विक्रम श्रीराम गावंडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. या आरोपींपासून आपल्या जीवाला धोका असून, त्यांनी बेकायदेशीर कृत्य करू नये त्यासाठी त्यांना समज देण्यात यावी व त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT