gadchiroli
gadchiroli 
विदर्भ

तस्कर व शिकारी सक्रीय; वनविभागाने वाढवली गस्त

सकाळ वृत्तसेवा

सिरोंचा (जि. गडचिरोली) : लॉकडाऊनचा फायदा घेत सागवान तस्कर सक्रिय झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने जंगलातील गस्त वाढवली असून ग्रामीण भागात वन व्यवस्थापन समितीच्या महिलांही सतर्क झाल्या आहेत.
आलापल्ली, भामरागड व सिरोंचा या वन विभागांतर्गत सागवान तस्कर सक्रिय झाले आहेत. लगतच्या छत्तीसगड व तेलंगणा राज्यात येथील सागवानाला मोठी मागणी आहे. सिरोंचा तसेच लगतच्या तालुक्‍यात मौल्यवान सागवान मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
तस्कर घेत आहेत संधीचा फायदा
तस्करीसाठी नदीचा मार्ग सोयीस्कर असल्याने स्थानिकांच्या मदतीने सागवान तस्करी केली जाते. लॉकडाऊनच्या काळात गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी वनविभागाने टाकलेल्या धाडीत लाखो रुपये किमतीच्या सागवान पाट्या जप्त करण्यात आल्या. कोरोनामुळे सध्या जंगलात वनविभागाकडून कुठल्याही प्रकारचे कामे सुरू नसल्याचा फायदा तस्कर घेत आहेत.
शिकारीचे साहित्य व 29 सायकली जप्त
दोन दिवसांपूर्वी आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कंपार्टमेंट क्रमांक 71 मध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे मांस, शिकारीचे साहित्य व 29 सायकली जप्त करण्यात आल्या. वनविभागाचे पथक नियमित गस्तीवर असताना आलापल्लीजवळ असलेल्या एका नाल्याच्या परिसरात वन्यजीवाचे मांस आढळून आले. उपविभागीय वनाधिकारी नीतेश देवगडे, आरएफओ मनोज चव्हाण, गणेश लांडगे, विनोद शिंदे, शंकर गुरनुले, अनिल झाडे, आर. एस. देवकर्ते, दामोधर चिव्हाणे, एल. एस. येलचिपुरवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकारी एकत्र येऊन वन्यप्राण्यांची शिकार करण्यात आल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा - माहिती लपवित असल्याने महापालिकेने उचलले कठोर पाऊल; तब्बल इतक्या नागरिकांसोबत करणार असं...
वनकर्मचारी दिवसरात्र गस्तीवर
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिक आपापल्या सुरक्षेची काळजी घेत घरातच राहात आहेत. मात्र, जंगल व वन्यप्राण्याच्या सुरक्षेसाठी वनकर्मचारी दिवसरात्र गस्तीवर असतात. यामुळे तस्कर व शिकाऱ्यांना फारशी संधी मिळत नाही. सध्या जंगलात आगी लावण्याचे प्रकार सुरू असल्याने कर्मचारी सतर्क राहून यावर नियंत्रण ठेवत आहेत.
 सुमित कुमार, उपवनसंरक्षक, सिरोंचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT