Accident sakal
विदर्भ

हायवा ट्रक ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार

गिट्टी भरलेला हायवा ट्रक बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला.

सकाळ वृत्तसेवा

गिट्टी भरलेला हायवा ट्रक बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला.

गडचिरोली - गिट्टी भरलेला हायवा ट्रक बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला. ही घटना चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील प्रस्तावित लोहप्रकल्पात गुरुवार (ता. २७) दुपारी १२. १५ वाजताच्या सुमारास घडली. मिथुन निर्मल मंडल (वय ३८) रा. बहादूरपूर, ता. चामोर्शी, असे मृताचे नाव आहे.

कोनसरी येथे लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीच्या वतीने लोह कारखाना उभारण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक हायवा आणि ट्रॅक्टरद्वारे करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी तेथे ट्रॅक्टर उभा असताना बाजूने गिट्टी घेऊन जाणारा हायवा ट्रक या ट्रॅक्टरवर उलटला. यात ट्रॅक्टरचालक मिथुन मंडल हा हायवाखाली दबला. त्याला लगेच आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Tension: पाकिस्तानची मध्यस्थी निष्फळ ठरली! इराणसोबतचा करार संपुष्टात; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, तणाव वाढणार

Shravan 2026 : श्रावण सुरु होण्यापूर्वी ईशान्य दिशेला ठेवा 'या' पाच वस्तू, घरात नांदेल सुख-समृद्धी

Persistent Bone Pain: हाडांमध्ये सतत वेदना होतात? दुर्लक्ष करू नका; असू शकतात 'या' गंभीर आजारांचा इशारा

Water Crisis: आज पूर... उद्या पाण्यासाठी युद्ध? २०५० पर्यंत भारत 'Water Scarce' देश होण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT