file photo
file photo 
विदर्भ

सहा बिल्डर्सवर प्राप्तिकर विभागाचे छापे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील प्रसिद्ध सहा बिल्डर्सच्या निवासस्थानांसह 20 प्रतिष्ठानांवर करचोरी केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने आज सकाळी छापे मारले. यामुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सहा लॉकर्ससह लाखो रुपयांचे दागिने आणि बेनामी संपती जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्लॉट आणि बांधकाम व्यवसाय करताना सहाही बिल्डर्स रोखीने मोठ्या प्रमाणात व्यवहार करून प्राप्तिकराची चोरी करीत असल्याची माहिती विभागाला गुप्तपणे मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी पाळत ठेवून होते. दरम्यान, रोखीने व्यवहार केले जात असल्याचे लक्षात आल्याने प्राप्तिकर विभागाने ऑरेंज सिटी हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि सप्तगिरी समूहाचे संचालक अतुल यमसनवारसह भागीदार व्यंकटेश कुणावार, सुधीर कुणावार, चंद्रकांत पदमावार, विश्‍वास चकलनवार आणि प्रशांत बोनीरवार यांच्या निवासस्थानांसह प्रतिष्ठांनावर छापे मारले. त्यात अजनी चौकातील एनवायके टॉवर्समधील कार्यालयासह खरे टाउन, नरेंद्र नगर, खामला रोड, वर्धा रोड, शिवाजी नगर, डोंगरगाव, बुटीबोरी, चंद्रपूर आणि यवतमाळ, घाटंजी अशा 20 ठिकाणांचा समावेश आहे. छाप्याच्या कारवाईत 150 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत.
सर्वच बांधकाम व्यावसायिक 30 पेक्षा अधिक प्रतिष्ठानांच्या माध्यमातून बांधकाम आणि प्लॉटच्या विक्रीचा व्यवसाय करीत होते. हे व्यवहार करीत असताना प्राप्तिकराची मोठ्या प्रमाणात चोरी करीत असल्याची माहिती गुप्तपणे मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत विविध बॅंकांमधील सहा लॉकर्स मिळाले असून, त्यांना सील करण्यात आले आहे. तसेच लाखो रुपये रोख आणि बेनामी दागिनेही मिळाल्याची माहिती आहे. याशिवाय संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रेही प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. तीन वर्षांपूर्वी प्राप्तिकर विभागात एक्‍सेल कंट्रोल लिमिटेडवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारवाई सलग दोन ते तीन दिवस चालण्याची शक्‍यता आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अघोषित संपत्ती आणि दागिने सापडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT