File photo
File photo 
विदर्भ

उन्हाळी परीक्षा आवेदनपत्र स्वीकारण्याच्या तारखांमध्ये वाढ

सकाळवृत्तसेवा

अमरावती ः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे उन्हाळी 2019 सत्रपद्धती व वार्षिक पद्धती अभ्यासक्रमाच्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र महाविद्यालयाने विद्यापीठात सादर करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. संबंधित वर्गवारीतील विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे महाविद्यालयाने आवश्‍यक शुल्क व विहित विलंब शुल्क प्रतिदिन 50 रुपये याप्रमाणे 8 मार्च 2019 पर्यंत स्वीकारून 11 मार्च 2019 पर्यंत विद्यापीठात सादर करावयाची आहेत.
विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उन्हाळी 2019 सत्रपद्धती व वार्षिक पद्धती अभ्यासक्रमाच्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र विद्यापीठात सादर करावयाच्या तारखेत वाढ केली आहे. परीक्षा आवेदनपत्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ कार्यालयाच्या दर्शनी भागावरील संबंधित परीक्षेच्या खिडकीवर 11 मार्च 2019 रोजी स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विनिर्दिष्ट अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांकरिता ही अंतिम संधी असून व्यक्तिगत व इतर कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे विद्यापीठात सादर करावयाचे राहून गेले, अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाने वाढवून दिलेली तारीख महाविद्यालयांनी अवगत करून देण्याचा प्रयत्न करावा, याबाबत विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व पदव्युत्तर शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख यांना पत्र पाठवून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT