संविधान चौक : आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे सदस्य व विद्यार्थी.
संविधान चौक : आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे सदस्य व विद्यार्थी.  
विदर्भ

पोलिस भरतीत अन्याय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्र पोलिस आयुक्‍ताद्वारे पोलिस शिपाईपदाच्या 271 जागा नागपूर शहरासाठी काढण्यात आल्या. परंतु, नागपूर शहरात ओबीसी व एस.सी. प्रवर्गाला एकही जागा दिलेली नाही. पदभरतीत 19 व 13 टक्‍के आरक्षणाचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाद्वारे शनिवारी (ता. 14) दुपारी 12 वाजता संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.
पोलिस भरतीत ओबीसींना नागपूर, भंडारा, ठाणे, रत्नागिरी, जालना व गोंदिया या जिल्ह्यांत एकही जागा दिलेली नाही. तसेच महाराष्ट्र राज्य आरक्षण धोरणाचे उल्लंघन करण्यात आले आहे. एस. सी. समाजालासुद्धा 13 टक्‍के आरक्षण असतानाही एकही जागा दिलेली नाही. सरकारने लवकरात लवकर ही जाहिरात रद्द करून ओबीसी समाजाला 19 व एस.सी. समाजाला 13 टक्‍के आरक्षण द्यावे. अन्यथा आमदार, खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करून झोपल्याचे सोंग घेतलेल्यांना जागे केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलकांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT