File photo
File photo 
विदर्भ

आयुष्यावर जगण्याची छाप सोडणारा जयराज कालवश

सकाळवृत्तसेवा

नागपूर : मस्क्‍युलर डिस्ट्रोफी या अंथरुणाला खिळवून ठेवणाऱ्या आजाराचा रुग्ण असूनही आयुष्यावर जगण्याची छाप सोडणारा जयराज मुकुंद सरमुकद्दमचे (वय 28) आज निधन झाले. एखादा धडधाकट माणूस जे करू शकणार नाही ते जयराजने आपल्या छोट्या आयुष्यात करून दाखविले. आजार बळावल्यामुळे जून 2018 त्याचा जगण्याशी संघर्ष सुरू होता.
वयाच्या आठ-नऊ वर्षांपर्यंत सामान्य बालकांप्रमाणे असलेल्या जयराजचे चवथ्या वर्गात असल्यापासून एकेक अवयव निकामी होणे सुरू झाले. वैद्यकीय तपासण्यांमध्ये तो मस्क्‍युलर डिस्ट्रोफीचा रुग्ण असल्याचे निदान झाले. या आजाराच्या रुग्णांचे सरासरी आयुष्यमान 28 ते 30 च्या आसपास असते. जयराज चालू शकत नव्हता, हातही हलवू शकत नव्हता. अशाही परिस्थितीत अभियांत्रिकीची परीक्षा 72 टक्‍के गुणांनी उत्तीर्ण करून मस्क्‍युलर डिस्ट्रोफी असलेला जगातील एकमेव अभियंता होण्याचा मान त्याने पटकावला. जयराजने मॅट्रिकच्या परीक्षेत 82 टक्‍के आणि पॉलिटेक्‍निक इंजिनिअरिंगमध्ये 70 टक्‍के गुण मिळविले होते.
अपंग असूनही लहान वयापासूनच जयराजने अनेक साहसी खेळांमध्ये भाग घेतला. त्याने अरबी समुद्रावर पॅरासेलिंग केले, हिमालयात गंगा नदीत रिव्हर राफ्टिंग, गंगेच्या उगमस्थानी 14 हजार फूट उंचीवरील गोमुख ग्लेशियरला त्याने भेट दिली. दुबईतील वाळवंटात डेझर्ट सफारीही त्याने केली होती.
शिक्षण आणि क्रीडा प्रकारांमध्ये कर्तृत्व दाखवणाऱ्या जयराजने चार धाम यात्रा सात वेळा तर वैष्णोदेवीची यात्रा चार वेळा केली. बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले, जम्मू-काश्‍मीर ते कन्याकुमारी, द्वारका ते कोलकाता असे भारतभ्रमणही केले. काही परदेश दौरेही त्याने केले.
जयराजला अनेक पुरस्कार आणि पारितोषिके मिळाली आहेत. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, समाजसेवक डॉ. विकास आमटे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, योगमहर्षी राम खांडवे, अभिनेता अभिषेक बच्चन, विवेक ओबेराय अशा अनेक सुप्रसिद्ध व्यक्‍तींनी जयराजच्या जिद्दीला सलाम करून त्याचा गौरव केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT