Jayant patil make big statment about deputy CM post in Maharashtra  
विदर्भ

काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार का? जयंत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले... 

राजकुमार भितकर

यवतमाळ  : महाविकास आघाडी स्थापन करताना पदवाटपाबाबत तिन्ही पक्षांची सखोल चर्चा झालेली आहे. उपमुख्यमंत्री पदाचाही त्यात समावेश होता. काँग्रेसकडून अद्याप तशी मागणी आलेली नाही. विधानसभा अध्यक्षपद मोकळे झाले असून, त्यावर चर्चा होईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त यवतमाळला आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकरणकर, निरीक्षक किशोर माथनकर, माजी आमदार संदीप बाजोरीया उपस्थित होते. पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी करताना सर्वच विषयांवर चर्चा झाली आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले होते. सध्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले. त्यामुळे त्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील. भाजपच्या काळात राज्याची आर्थिकस्थिती अडचणीची झाली आहे. अनेक हजार कोटी थकले आहेत. कोरोनाच्या काळातील वीजबिलाचा मुद्दा आहे. त्यासंदर्भात ऊर्जामंत्री योग्य निर्णय घेतील. थकबाकीमुळे महावितरणची स्थिती अडचणीची झाली आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पाटील म्हणाले

मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरू होत आहे. त्यात राज्य सरकारने आपली भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाचे हक्काचे आरक्षण शासन कमी करणार नसल्याचेही ते म्हणाले.

अन्नदात्याला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न

दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन दोन महिन्यांपासून सुरू आहे. शेतकरी आत येऊ नयेत म्हणून त्यांच्या मार्गावर खिळे ठोकले जात आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. एवढीच सुरक्षा पाकिस्तान व चीनच्या सीमेवर केली असती, तर देश आणखी सुरक्षित झाला असता. केंद्र शासन ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, ते अत्यंत चुकीचे असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी विदर्भात बैठक

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT