file photo
file photo 
विदर्भ

ज्वेलरी दुकान फोडणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : परतवाडा येथील सराफा व्यावसायिकांसह एकूण पाच प्रतिष्ठान फोडून 77 लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हेशाखेने जालना येथील गुरुगोविंदनगर येथून अटक केली. तिघांसह पोलिस बुधवारी (ता. 28) शहरात दाखल झाले.
विजयसिंग कृष्णासिंग भादा, संजुसिंग कृष्णासिंग भादा (दोघेही रा. गुरुगोविंदनगर, जालना) व सुंदरसिंग सुखलालसिंग राजपूत (रा. लोधी मोहल्ला, जालना) असे अटक झालेल्यातिघांची नावे आहेत. त्यापैकी सुंदरसिंग याचे वडील परतवाडा येथे राहतात. तो वडिलांच्या भेटीसाठी अनेकदा परतवाड्यात येत होता. विजयसिंग व संजुसिंग सख्खे भाऊ आहेत. या तिघांकडून दोन नवीन एल.ई.डी. टीव्ही, 7 मोबाईल, 60 हजार रुपयांचे चांदीचे दागिने, 2 हजार 410 रुपयांची रोख रक्कम आणि दीडशे ग्रॅम सोन्याचे दागिने असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला. या टोळीने शनिवारी (ता. 24) रात्री अमरावतीच्या गाडगेनगर हद्दीतून एक दुचाकी व कार चोरली होती. दुचाकी खोलापुरीगेट हद्दीत बेवारस सोडून चोरीची कार परतवाडा येथील गुन्ह्यात वापरली. 25 ऑगस्ट रोजी परतवाड्यात ऐवज लुटून हे त्रिकुट कारने अमरावतीत आले व ऍकेडमिक हायस्कूल येथे कार बेवारस सोडली. पहाटे ऑटोने इतवारातून बसस्थानकावर पोहोचल्यावर एस.टी. बसने जालनाकडे फरार झाले.
पोलिसांचे दुर्लक्ष
ग्रामीण पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज व ऑटोचालकाच्या चौकशीचा आधार तपासात घेतला. परंतु शहरातून कार व दुचाकी चोरून, कारचा गुन्ह्यात वापर झाल्याची माहिती हाती असतानाही अमरावती शहर पोलिसांनी तशी तत्परता दाखविली असती, तर हेच अट्टल चोरटे शहर पोलिसांच्या हाती लागले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर, धाराशीव नामांतराला विरोध करणारी स्थानिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Met Gala 2024 : किम कार्देशीयनने मेट गालामध्ये लावली चक्क स्वेटरमध्ये हजेरी ; फॅन्स झाले नाराज

Sharad Pawar: विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?, इंडिया आघाडी म्हणजे १९७७ मधला जनता पक्ष, शरद पवार काय म्हणाले?

Ajit Pawar : कारखाने बंद पाडायचा माझा उद्योग नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

SCROLL FOR NEXT