khamgaon 21 villages water supply sakal
विदर्भ

Khamgaon : खामगावसह २१ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला,मन प्रकल्पामध्ये शंभर टक्के जलसाठा

Khamgaon : खामगाव तालुक्यातील मन प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाल्यामुळे खामगाव शहरासह २१ गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. यामुळे सिंचनासाठी देखील मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

खामगाव : तालुक्यातील शिरला नेमाने येथील मन प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या खामगाव शहरासह २१ गावांतील नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला आहे. तसेच सिंचनासाठी देखील पाणी उपलब्ध होणार आहे.

खामगाव तालुक्यातील शिरला परिसरातील मन प्रकल्पावरून २१ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तर खामगाव शहराला सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा सुरू झाला आहे. या योजनेंतर्गत परिसरातील लाखनवाडा, आंबेटाकळी, शिरला, कंचनपूर, बोथाकाजी, बोरी, अडगाव, आसा, दुधा, चिचपूर, फतेपूर, उमरा, अटाळी, कदमापूर, घारोड, आकोली, जयराम गड, पेडका, शहापूर अशा २१ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो.

सुरुवातीपासूनच यावर्षी पाऊस झाला. परिणामी, नदी नाले वाहत आहेत. मन प्रकल्पा अंतर्गत पाणीपुरवठा करण्यात याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पाण्याचे स्त्रोत या भागांमध्ये उपलब्ध नाही. परंतु यावर्षी चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध राहणार आहे. प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा प्रश्न देखील मिटला आहे.

रबीचे पीक बहरणार

यावर्षी दमदार पाऊस पडल्याने प्रकल्पात भरपूर पाणीसाठा झाला आहे. प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्यामुळे येणाऱ्या रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चार हजार हेक्टरवर रबीचे पीक बहरणार आहे.

सुरुवातीपासूनच यावर्षी पाऊस झाला. परिणामी, नदी नाले वाहत आहेत. मन प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्याचबरोबर सिंचन सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल.

- के. एस. लोहार, उपविभागीय अधिकारी शिरला मन प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT