Krishi Kanya sakal
विदर्भ

Krishi Kanya : कृषिकन्यांनी राबविली पशु लसीकरण मोहीम

लम्पी रोगाविषयी केली शेतकऱ्यांची जनजागृती

सकाळ वृत्तसेवा

हिवरा आश्रम : येथूनच जवळ असलेल्या पोखरी गावामध्ये निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि कार्यनुभव अंतर्गत कृषिकन्यांनी लंपी चर्मरोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशु लसीकरण मोहीम राबविली. लंप्पी रोगाविषयी जनजागृती केली. विवेकानंद कृषि महाविद्यालय कृषि कार्यानुभवाच्या भूमी रत्न ग्रुपमध्ये प्रिया तायडे, अंकिता भगत , प्रगती गाळकर, कल्याणी निकाळजे , पूनम छळकर , प्रतीक्षा घोडे, शैला संबारे , अंजली पाटील या विद्यार्थींनीचा समावेश आहे.

यावेळी पशु लसीकरण संपल्यावर शेतकर्‍यांना लम्पी रोगाबाबत मार्गदर्शन केले. जनावरांवर लम्पीची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लम्पी त्वचा रोग हा गाय आणि म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. त्यामुळे बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. जनावरांचा गोठ्यामध्ये ते स्वच्छता ठेवावी. त्वचेवरील गाठीचे जखमेत रूपांतर त्या झाल्यास जखमेत जंतू पडू नये यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे असे आवाहन पशूवैद्यकिय अधिकारी डॉ. विलास गोफणे यांनी केले. यावेळी विवेकानंद कृषि कार्यानुभवाच्या विद्यार्थीनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,कार्यक्रम समन्वयक प्रा.एम व्ही खोडके,प्रा. एस डी जाधव , प्रा.एम.एच.कडू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आम्ही विवेकानंद कृषि महाविद्यालयाच्या कृषि कार्यानुभवच्या विद्यार्थीनींनी कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मेहकर तालुक्यातील पोखरी येथे लम्पी रोगाचा प्रचार रोखण्यासाठी पशूचे लसीकरण केले. यासोबत शेतकरी बांधवांना लम्पी रोगाबाबत जनजागृती केली.

-प्रिया तायडे विद्यार्थीनी, विवेकानंद कृषि महाविद्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT