विदर्भ

कुकरेजांची दहा कोटींपेक्षा अधिक जीएसटी चोरी?

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : जीएसटी दक्षता विभागाने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती तसेच स्थायी समितीचे माजी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या कुकरेजा इन्फ्रावर टाकलेल्या छाप्यात दहा कोटींपेक्षा अधिक जीएसटीची चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांतर्फे ही कारवाई दडपण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचीही चर्चा विभागात आहे.
अधिकाऱ्यांनी 18 तास कुकरेजा यांच्या कंपनीच्या कार्यालयातील फाइल्सची तपासणी करून संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा तयार केला आहे. आज सोमवारी जीएसटी कार्यालयात जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असली तरी त्याबद्दल बोलण्यास कोणीच तयार नव्हते. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनी कारवाई केली तेव्हा त्यांना या बांधकाम व्यावसायिकाविषयी काहीच माहिती नसल्याचे बोलले जात आहे. प्रकल्पाचे संचालक जीएसटीची चोरी करीत असल्याची तक्रार विभागाला मिळाली होती. त्यांची माहिती काढली असता त्यांना संशय आला. त्यानंतर जीएसटी विभागाने तपास सुरू केला. शुक्रवारी दुपारी कुकरेजा यांच्या कार्यालयात जीएसटी अधिकाऱ्यांनी अचानक धडक दिली. सलग दीड दिवस तपास केल्यानंतर अधिकाऱ्यांनी संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेऊन कार्यालयात परतले. या कागदपत्रानुसार विभागाला अहवाल तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर जीएसटीची किती चोरी केली हे उघड होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT