विदर्भ

भाषातज्ज्ञ परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन

सकाळवृत्तसेवा

नागपूर - ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता. १५) नागपुरात हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. प्र. ना. परांजपे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा प्राचार्य राम शेवाळकर स्मृती भाषाव्रती पुरस्कार मंगळवारी प्रदान केला जाणार होता. त्यानिमित्त परांजपे दाम्पत्य नागपुरातील नॉर्थ व्हिव्ह हॉटेलमध्ये मुक्कामाला होते.

यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘साहित्यकेंद्री अभ्यासक्रमांमुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था’ या विषयावरील परिसंवादात प्र. ना. परांजपे अध्यक्ष म्हणून सहभागी होते. प्र. न. परांजपे यांची प्रकृती ठीक नसते म्हणून त्यांच्या पत्नी संपूर्ण दौऱ्यात सोबत होत्या. १३ जानेवारीला परिसंवाद आटोपल्यावर दोघेही नागपूरला आले. १४ जानेवारीला त्यांनी स्थानिक मित्रमंडळींच्या भेटी घेतल्या. रात्री उशिरा वसुधा परांजपे यांना अस्वस्थ वाटत होते; पण दगदगीमुळे असावे, या विचाराने त्यांनी दुर्लक्ष केले. सकाळी सहाच्या सुमारास त्यांना श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने रुग्णवाहिकेने शुअरटेक हॉस्पिटल येथे आणले. पण, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी यावेळी परांजपे यांच्यासोबत होते. डॉक्‍टरांनी वसुधा परांजपे यांना मृत घोषित केल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यादरम्यान त्यांचे सातारा व इतर भागांतील काही नातेवाईक नागपुरात दाखल झाले. मुलगा पराग परांजपे मुंबईहून आल्यावर रात्री दहाच्या इंडिगो विमानाने त्यांचा मृतदेह पुण्याला नेण्यात आला. या घटनेची माहिती महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली. नागपूरहून पुण्याला रवाना होण्यापूर्वी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे आणि पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांनी घटनेची माहिती मिळताच प्र. ना. परांजपे यांच्या भेटीसाठी धाव घेतली. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ दिवाकर मोहिनी, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. विद्या देवधर, महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, आशुतोष शेवाळकर, महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे, कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके, प्रकाश पायगुडे यांच्यासह परांजपे यांच्या नातेवाइकांपैकी विजया देव आणि सिद्धार्थ साठे आदी मंडळी प्र. ना. परांजपे यांचे सांत्वन करण्यासाठी उपस्थित होती. 

पुरस्कार सोहळा पुढे ढकलला
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने प्र. ना. परांजपे आणि दिवाकर मोहिनी यांना राम शेवाळकर भाषाव्रती पुरस्कार जाहीर झाला होता. विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी (ता. १५) प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणार होता. मात्र, प्र. ना. परांजपे यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे हा पुरस्कार सोहळा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळातील पदाधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

SCROLL FOR NEXT