विदर्भ

एकाचवेळी निघाली चौघांची अंत्ययात्रा, गावात फुटला अश्रूचा बांध

सकाळ वृत्तसेवा

आष्टी शहीद (जि. वर्धा) : वर्धा नदी पात्रात (wardha river incident) मंगळवारी १४ सप्टेंबरला बोट उलटली. त्यामध्ये ११ जण नदीत बुडाले. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील तारासावंगा गावातील पाच जणांचा समावेश होता. आज तब्बल ४८ तासांच्या प्रयत्नानंतर सर्व मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले. मृतदेह गावात पोहोचताच स्मशान शांतता पसरलेल्या गावात अश्रूंचा बांध फुटला. चौघांचीही एकाच वेळी अंत्ययात्रा निघाली आणि सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अख्ख गाव धायमोकलून रडत होतं.

माझ्या दोन्ही मुली गेल्या हो...

दोन्ही मुलींना लाडाने वाढविले. पण, माझ्या एक नाहीतर दोन्ही मुली देवाने हिरावल्या हो...चार दिवसापूर्वी आनंदाने घरून गेलेल्या मुली एकदा गेल्या त्या पुन्हा परतल्याच नाही. आता त्या देवाघरी गेल्या. देवाने आमच्या जीवनातील आनंदच हिरावला, असं म्हणत टाहो फोडला. ज्याने वर्धा नदीच्या दुर्घटनेत आपल्या दोन्ही गमवल्या, त्याच दुर्दैवी बापाचा हा आक्रोश आहे. तारसावंगा गावचे चार मृतदेह होते. त्यामध्ये सुखदेव खंडाळे यांच्या १३ वर्षाची अदिती आणि ११ वर्षाची मोहिनी अशा दोन मुलीचा समावेश होता. बोट उलटून आपल्या दोन्ही मुली बुडाल्याचे कळताच बापाने टाहो फोडला.

सुखदेव खंडाळे, मृत मोहिनी अन् अदितीचे वडील

चारही मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार -

तारासांवंगा येथील अश्विनी अमर खंडाळे (वय 21 वर्ष), आदिती सुखदेव खंडाळे (वय 13 वर्ष), अतुल गणेश वाघमारे (वय 25 वर्ष), आणि अतुलची नवविवाहित पत्नी वृषाली अतुल वाघमारे (वय 19 वर्ष) या चार जणांचे मृतदेह सुरुवातीला तारासावंगा येथे आणले. त्यांच्यावर स्थानिक भडक नाल्याच्या तीरावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्वात शेवटी सापडला मोहिनीचा मृतदेह-

आज सकाळी सात मृतदेह सापडले होते. मात्र, दुपारच्या सुमारास सातवा मृतदेह सापडला. तो मृतदेह होता सुखदेव खंडाळे यांच्या ११ वर्षीय मोहिनीचा. एका मुलीचा मृतदेह मिळाला. दुसरीचा मृतदेह मिळताच तिच्यावरही तारसावंगा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic Jam Update : झाली दिवाळी! परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा....

Satara Doctor Case : साताऱ्यात महिला डॉक्टरने शारीरिक अत्याचाराला कंटाळून जीव दिला! तिच्यावर दबाव टाकणारा 'तो' खासदार कोण?

AUS vs IND: विराट -रोहितची फक्त फलंदाजीमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही हवा; २-२ कॅच घेत केले मोठे विक्रम

Pune News : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची जैन बोर्डिंगला भेट; जैन मुनींपुढे नतमस्तक

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT