मागणीचे निवेदन चंद्रकिशोर पांडे यांना देताना मुक्तिपथ संघटक केशव चव्हाण.
मागणीचे निवेदन चंद्रकिशोर पांडे यांना देताना मुक्तिपथ संघटक केशव चव्हाण. 
विदर्भ

तंबाखूजन्य पदार्थ विकल्यास किराणा दुकानदारांवर कायदेशीर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

अहेरी : अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या किराणा दुकानात खर्रा तसेच कुठलाही तंबाखूजन्य पदार्थ आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भातील पत्र अहेरी/आलापल्ली किराणा दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे यांनी तालुक्‍यातील दुकानांना पाठवले आहे. मुक्तिपथ सोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या मागणीचे निवेदनही मुक्तिपथद्वारे त्यांना देण्यात आले.


कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात कुठेही खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 अन्वये कारवाईचे निर्देश दिले आहे. त्याचबरोबर अन्न पदार्थ विक्री होत असलेल्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ विकणे हा अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कायदा 2006 अन्वये गुन्हा आहे. दुकानाचा परवाना रद्द करण्याची तरतूद या कायद्यान्वये करण्यात आली आहे. असे असतानाही अहेरी व आलापल्ली या शहरांसह तालुक्‍यातील अन्न पदार्थ विक्री होत असलेल्या किराणा दुकानांत सर्रास खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात. त्यामुळे नियमाचा भंग होत आहेच पण कोरोना संसर्ग पसरण्याचाही धोका वाढला आहे.

ही विक्री रोखण्यासाठी काहीच दिवसांपूर्वी नगरपंचायत शासन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समिती आणि मुक्तिपथद्वारे संयुक्तपणे शहरातील अनेक दुकानांवर कारवाई करण्यात आली. दुकानांतून होणारी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री पूर्णतः बंद करण्यासाठी येथील मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण यांनी अहेरी/आलापल्ली किराणा दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे यांची भेट घेऊन त्यांना या विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले. तसेच शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. ही बाब समजून घेत असोसिएशनच्या वतीने एक पत्र काढून तालुक्‍यातील जवळपास 30 मोठ्या दुकान चालकांना असोसिएशनद्वारे पाठवण्यात आले.
 

अध्यक्षांचे आवाहन
दुकानात कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करू नये, गोदामात साठवणूक करू नये. विक्री करताना आढळल्यास विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व याकरिता दुकानदार स्वतः जबाबदार राहील. त्यामुळे विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन अहेरी/आलापल्ली किराणा दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे केले आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT