विदर्भ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

सकाळवृत्तसेवा

बुलडाणा : तालुक्यातील वडगाव (खंडोपंत) येथील शेतकरी हे त्यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारपंप सुरू करण्यासाठी जात असताना अचानक बिबट्याने शेतकर्‍यावर हल्ला चढविल्याची घटना आज (ता.13) सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. 

वडगाव खडोपंत येथील शेतकरी राजू रामधन बावस्कर (वय 40) हे शेतकरी शेतात  पिकाला पाणी देण्यासाठी जात होते. दरम्यान झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. त्यामध्ये शेतकरी हे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांच्यात व बिबट्यामध्ये झटापट होऊन ते गंभीर जखमी अवस्थेत तेथून कशीबशी सुटका करत तत्काळ मोबाईलवरून घरच्यांशी संपर्क साधला. यानंतर कुटुंबीयांसोबत गावातील असंख्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील आरडाओरड पाहून बिबट्याने जखमी  शेतकर्‍याला सोडून तेथून पळ काढला. यानंतर गावकर्‍यांनी राजू बावस्कर यांना तत्काळ मदत करून बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुटका केली. सदर शेतकर्‍याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर शेतकर्‍यावर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वडगाव खंडोपंत गावात व परिसरात दहशत पसरली आहे. घटनेनंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

माहितीनंतरही दुर्लक्ष

वडगाव खंडोपंत येथील काही शेतकर्‍यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी बिबट्याने हरीणला ठार करून झाडावर खात असताना बघितले होते. ही बाब काही शेतकर्‍यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना सांगितली. परंतु, याबाबत वन विभागाच्या अधिकार्‍यांनी गांभीर्याने न घेतल्याने सदर शेतकर्‍यांवर आज प्राणघातक हल्ला होऊ गमविण्याची वेळ आली असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.

सतर्क राहण्याचे आवाहन
या घटनेबाबत मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कोंडावार यांचेशी संपर्क केला असता त्यांनी बिबट असल्याचा दुजोरा दिला. नागरिकांनी सतर्कता बाळगण्यासाठी गावात मुनादी देण्यात येणार असून, जखमी शेतकर्‍याला मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : एक सच्चा देशभक्त संसदेत पोहोचणार आहे- आशिष शेलार

SCROLL FOR NEXT