leopard attack sakal
विदर्भ

Chandrapur : मध्यरात्री बिबट गावात आला सात मेंढराला मारून गेला

घरातील मंडळी उठून बघते तर गोठ्यात बिबट मेंढरावर ताव मारत होता.

संदीप रायपुरे

गोंडपिपरी : मध्यरात्री गाढ झोपेत असतांना अचानक जोरजोराचा आवाज सूरू झाला.घरातील मंडळी उठून बघते तर काय गोठ्यात बिबट मेंढरावर ताव मारत होता.घाबरलेल्या अवस्थेत मदतीसाठी बोलावणी केल्यावर गावकरी आले.अन अथक परिश्रमानंतर बिबट्याला हाकलून लावले.पण या सार्या भानगडीत सात मेंढराचा मृत्यू झाला तर सात मेंढर गंभीर झाली.ऐन हाडोखात एवढ नूकसान झाल्यान आता बळीराजा चिंतेंच्या तावडीत सापडला आहे.

राज्याच्या सिमेवरील गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गाव.गावातील पत्रू भिवा गोंधळी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.त्यांच्याकड चौदा मेंढर होती.शुक्रवारच्या मध्यरात्री घरासमोर मोठमोठ्यान आवाज आल्यान गोंधळी कुटुंबीय जाग झाल.घराबाहेर असलेल्या कोट्यात बघितले तर काय तिथे मोठा बिबट मेंढरावर ताव मारत होता.घाबरलेल्या अवस्थेत गोंधळींनी मदतीसाठी लोकांना बोलाविले.गावकरी एकत्र आल्यानंतर त्यांनी शिताफीन बिबट्याला हाकलून लावल.

आत गोठ्यात बघितल असता.सात मेंढर जागीच ठार झालेली होती.तर इतर सात मेंढर गंभीर जखमी झालीत.अचानकपणे बिबट्यान गोठ्यात घूसून केलेल्या हल्यात पशुधन गमावल्यान गोंधळी कुटुंबियांत मोठीच चिंता पसरली.सकाळी सरपंच देविदास सातपुते यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली.वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.ऐन हाडोखात एका गरीब शेतकर्याचे मोठे नूकसान झाल्याने तो प्रचंड संकटात सापडला आहे.

कोट

पोडसा गावात वन्यजिवांकडून शेतपिकांचे मोठे नूकसान होते.आता तर बिबट गावात घुसून जनावर मारू लागला आहे.यामूळ मानवी जिवनास देखील धोका निर्माण झाला आहे.पोडसा गावात वन्यजिवांचा प्रचंड हैदोस असतांना गावाला विभागाने वनव्यवस्थापन समितीपासून दूर ठेवले आहे.गावातील हे प्रकार लक्षात घेता पोडसा गावाचा वनसमीतीत समावेश करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

FDA Raid: एफडीएच्या छाप्यात मोठा खुलासा! नागपुरात गर्भपाताच्या औषधांचा बेकायदा साठा जप्त; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री..

SCROLL FOR NEXT