liquor smuggling in yavatmal
liquor smuggling in yavatmal 
विदर्भ

दारू तस्करीला आळा बसेना, भाजीपाला वाहतुकीची शक्कल लढवत केली जातेय वाहतूक

सूरज पाटील

यवतमाळ : वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांत दारूबंदी करण्यात आली आहे. मात्र, याच दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांत सर्वाधिक मद्यपींची संख्या आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवैधधंदे बंद असल्याचा दावा केला जात असला तरीदेखील दारूतस्करी अजूनही सुरूच आहे. धान्य व भाजीपाला वाहतूक सुरू असल्याचे दाखवून दारूची वाहतूक केली जाते. 

दारूबंदी जिल्ह्यांसाठी यवतमाळ सेफ झोन मानला जातो. यवतमाळ येथे असलेल्या दारूच्या दुकानांची संख्या लक्षात घेता दारूतस्करांनी आपला मोर्चा मागील काही वर्षांपासून यवतमाळकडे वळविला आहे. वर्धा जिल्ह्यात अमरावती, मध्यप्रदेश, नागपूरसह यवतमाळ जिल्ह्यांमधून सर्वाधिक दारूची आयात केली जाते. वर्धा शहरात गल्लीबोळात होणारी दारूची विक्री लक्षात घेता तस्करांची लिंक कुठपर्यंत जुळून आहे, हे लक्षात येते. चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर व बुटीबोरी येथून चोरट्या मार्गाने दारू आणली जाते. लोक मजुरीच्या कामाला न जाता रेल्वेने विविध प्रकारचा बनाव करून दारू घेऊन येतात. दारूची तस्करी वरपांगी वाटतो तेवढी सोपा विषय नाही. त्यामधील पाळेमुळे खोलवर घट्ट रुजलेली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, वडकी, राळेगाव, झरी, मुकुटबन व वणी येथून चोरट्या मार्गाने दारूची तस्करी होते. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांत विक्री सुरू आहे. त्यामुळे ही बंदी नावालाच असल्याची ओरड केली जात आहे. एखादी कारवाई सोडल्यास अद्यापपर्यंत दारूतस्करीमधील म्होरक्‍यापर्यंत संबंधित विभागाचे हात का पोहोचू शकले नाहीत, हा संशोधनाचाच विषय आहे.

बनावट दारू घशाखाली -
मद्यपी शौक पूर्ण करण्यासाठी आपण कोणती दारू पीत आहोत, याची कोणतीही खातरजमा करीत नाहीत. यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये बनावट दारूची विक्री रोखण्यात अद्यापपर्यंत संबंधित प्रशासनाला यश आलेले नाही. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांत सर्वाधिक बनावट दारूची विक्री केली जाते. मद्यपी अव्वाच्या सव्वा पैसे मोजत असले तरीदेखील त्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT