list of party candidates for loksabha election will be announced in two days says Prakash Ambedkar in Press Conference
list of party candidates for loksabha election will be announced in two days says Prakash Ambedkar in Press Conference  
विदर्भ

Loksabha 2019 : आघाडीचे मार्ग बंद; दोन दिवसात होईल उमेदवार जाहीर

सुगत खाडे

अकोला : काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. आम्ही जाहीर केलेले 22 उमेदवार आता माघार घेणार नसून, वाटल्यास काँग्रेसने त्यांचे एबी फॉर्म या 22 उमेदवारांना द्यावे. वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 मार्चला सर्व 48 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेससोबत आघाडी झाल्यास त्या उमेदवारांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यातील एकही उमेदवार आता माघार घेणार नाही. वाटले तर काँग्रेसने या 22 उमेदवारांना त्यांच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे. त्याला आमची हरकत नाही. काँग्रेसकडे अनेक मतदारसंघात उमेदवार नाही. त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या 22 जागांचा प्रस्ताव मान्य करावा, असे काँग्रेस नेत्यांना कळविण्यात आले होते. यासंदर्भात लक्ष्मण माने आणि अण्णाराव या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांसोबत सोमवारी चर्चे केली. त्यांना हा प्रस्ताव मान्य नाही. त्यामुळे महाआघाडीत वंचित बहुजन आघाडीने सहभागी होण्याचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. त्यानंतर 15 मार्चपर्यंत चर्चेची दारे उघडी ठेवली असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतीभा सिरसाट, भारिप-बमसंचे महासचिव ज्ञानेश्‍वर सुलताने आदींची उपस्थिती होती.

अकोल्याचा निर्णय गुलदस्त्यात -
अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे ॲड.प्रकाश आंबेडकर लढणार किंवा नाही याबाबतचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे. मंगळवारी ते याबाबत घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र, काँग्रेससोबत आघाडीचे सर्व मार्ग बंद झाल्याने आता सर्वच 48 जागावर उमेदवार घोषित केले जातील, तेव्हाच अकोल्यातील उमेदवाराचे नावही निश्‍चित होईल, असे सांगण्यात आले. 

कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाही -
ॲड.प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढणार नाहीत, अशी शक्यता असल्याने त्यांच्या जागेवर प्रा. अंजलीताई आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, ॲड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी आंबेडकर कुटुंबातील कुणालाही दिली जाणार नाही, असे स्पष्ट करून या चर्चेला पूर्णविराम दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT