Ganja sakal media
विदर्भ

समुद्रपुरात गांजा तस्कर गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

त्याचे वजन दोन किलो ४५ ग्रॅम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : चंद्रपूर महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस गस्तीवर असताना जाम चौरस्ता येथे एका व्यक्तीची संशयावरून तपासणी केली असता त्याच्याकडे असलेल्या थैलीत मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला. या व्यक्तीचे नाव फिरोज खान चांद खान (वय ३६) रा. टट्टीगुडा, आदिलाबाद (तेलंगणा) ह.मु. जाम असे असल्याचे सांगण्यात आले.

त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून १० हजार रुपयांचा गांजा मिळून आला. त्याचे वजन दोन किलो ४५ ग्रॅम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दुचाकीसह ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कारवाई करून आरोपाली समुद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस गस्तीवर असताना जाम येथील हिंगणघाट रोडवरील 'सबका मालिक एक' या पानठेल्या समोर एका व्यक्तीकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. यावरून कारवाई करीत आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गोपाल ढोले, हवालदार निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, रंजीत काकडे, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, श्रीकांत खडसे, रामकिसन इप्पर, पवन पन्नासे, चालक मुकेश यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT