lockdown 
विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत नेमके काय काय राहणार बंद? काय आहेत निर्बंध?

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यास मज्जाव आहे. कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होते आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्‍यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

नव्या आदेशांनुसार चंद्रपूर जिल्ह्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?कशावर राहणार निर्बंध? ते यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

  • सार्वजनिक स्थळी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये.
  • नागरिकांनी कमीत कमी 6 फूट सामाजिक अंतर राखणे आवश्‍यक राहील.
  • सार्वजनिक ठिकाणी, स्थळी पान, तंबाखू, धूम्रपान करणे इत्यादी प्रतिबंध राहील.
  • धार्मिक स्वरूपाचे समुपदेशन, धर्मपरिषद, इत्यादीचे आयोजन करू नये.
  • कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात जनमानसात अफवा अपप्रचार व भीती व्हाट्‌सअप फेसबूक, ट्विटर, वृत्तपत्र, सोशल मीडिया व होर्डिंग इत्यादी वर प्रसारित करू नये.
  • अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये.
  • कोरोना विषाणूच्या अनुषंगाने घोषित करण्यात आलेल्या क्वारंटाइन स्थळांच्या 100 मीटर परिसरातर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे.
  • खासगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील, अशा सर्व प्रकारच्या मिरवणूक, रॅली, सामूहिक कार्यक्रम ,समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा, आंदोलने इत्यादींना मनाई राहील.
  • खासगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग, देशांतर्गत व परदेशी सहल यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील.
  • शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, मॉल, सुपरमार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्‍लब, पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण, तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा ,संग्रहालये ,गुटखा तंबाखू, पान विक्री इत्यादी बंद राहील.
  •  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Mangalwedha Drought: मंगळवेढ्यात पाणी-चाऱ्यासाठी काँग्रेसचे बेमुदत धरणे; काजू-बदामाच्या बैठकीवर चिरमुरे खाऊन आंदोलनाचा टोला

SCROLL FOR NEXT