Lok Sabha Election
Lok Sabha Election Esakal
विदर्भ

Lok Sabha Election: गर्दी जमत नसल्याने मेळावे, गृहभेटींवर भर रामनवमीला संपणार प्रचाराची रणधुमाळी, हातात फक्त चार दिवस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर: वाहने भरून लोकांना प्रचारासाठी घरातून ओढत आणण्याचे दिवस आता संपल्यात जमा आहेत. पूर्वी लाखोंच्या सभा व्हायच्या, पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यानुरूप नेत्यांनीही प्रचाराचे स्वरूप बदलले. छोटेखानी मेळावे घेण्यावर आणि गृहभेटींवर भर दिला जात आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराला अवघे चार दिवस उरले आहेत. येत्या १७ तारखेला म्हणजे रामनवमीला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

विदर्भात पहिल्या टप्प्यात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा एकच खासदार चंद्रपूर मतदारसंघातून बाळू धानोरकार यांच्या रूपाने निवडून आला होता. आता धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथे भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार मैदानात आहेत.

मुनगंटीवारांच्या प्रचारात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर दिसत नाहीत. तर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आठ दिवस झाले तरी चंद्रपूर मतदारसंघात फिरकले नाहीत.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यातच थेट लढत रंगली आहे. नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत आहे. वंचितने ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.

शहरात गडकरी हे विकासाच्या मुद्द्यावर मते मागत आहेत. दहा वर्षांत राबवलेल्या योजना आणि पुढील पाच वर्षांचा रोडमॅप ते जनतेसमोर ठेवत आहेत. विशेष म्हणजे गडकरी आणि विकास ठाकरे हे एकमेकांवर वैयक्तिक टीका टाळत आहे. माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांनी काँग्रेसच्या सभेत मोदींवर प्रखर टीका केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळला होता. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

नागपूरमध्ये एकूण २६ उमेदवार रिंगणात आहे. भाजप, काँग्रेस आणि बसपचे योगीराज लांजेवार यांचा अपवाद वगळता इतर कुठल्याच पक्षाचे अस्तित्व नाही. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र ‘वंचित’चा एकही कार्यकर्ता काँग्रेसच्या प्रचारात सहभागी झाला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा गडकरी यांच्या विरोधात सभा घेतली नाही.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी अद्यापही सुरुच आहेत. येथील काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. तर वंचितने आधी उमेदवारी दिलेले शंकर चहांदे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करून ‘वंचित’लाच धक्का दिला आहे. आता काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे आणि महायुतीचे राजू पारवे अशी थेट लढत होत आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार मात्र बर्वे यांच्यासाठी एकटेच लढत आहेत. त्यांच्या मदतीसाठी एकही काँग्रेसचा नेता अद्याप फिरकला नाही.

गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदार संघात खरी लढाई महायुतीचे अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे डॉ. नामदेव किरसान यांच्यातच आहे. गडचिरोतील दोन्ही उमेदवार बाहेरचे आहेत. भाजपचे नेते नागपूर जिल्ह्यातील तर काँग्रेसचे डॉ. किरसान गोंदियाचे आहेत. दोघांनाही विरोधी कार्यकर्ते बाहेरचे पार्सल म्हणून टोमणे मारत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT