boycott on voting in kirjavala village
boycott on voting in kirjavala village  sakal
विदर्भ

Boycott on Voting : कोंबड्यांच्या विष्ठेवरून मतदानावर बहिष्कार; किरजवळा गावातील नागरिक संतप्त

सकाळ वृत्तसेवा

चांदूररेल्वे - मागील अनेक दिवसांपासून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणारे किरजवळा येथील नागरिक आज निवडणुकीच्या दिवशी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. गावात केवळ नऊ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला.

अनेक दिवसांपासून कुक्कूटपालन व्यवसायींच्या कोंबड्यांच्या विष्ठेसंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या, आंदोलन केले, परंतु कुठल्याही प्रकारचा न्याय नागरिकांना मिळाला नसल्याने गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. किरजवळा गावात एकूण ५२६ मतदार आहेत, मतदान करणाऱ्यांमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, कोतवाल आणि पोलिस पाटील यांचा समावेश आहे.

चांदूररेल्वे तालुक्यातील किरजवळा येथील गावालगत कुक्कूटपालन व्यावसायिक निघालेली विष्ठा गावाच्या बाजूला आणून टाकत असल्यामुळे गावात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना याचा त्रास होत होता, त्यामुळेच कोंबड्यांचा विष्ठेच्या दुर्गंधीमुळे अनेक नागरिकांना आजाराचा त्रास झालेला आहे. अनेकदा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला. आंदोलने सुद्धा केली. तरीही प्रशासनाने गंभीर भूमिका घेतली नाही.

त्यामुळेच गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा चांदूररेल्वेचे उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता. परंतु हे प्रकरण न्यायालयात दाखल असल्यामुळे प्रशासन यावर काही तोडगा काढू शकले नसल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT