arres
arres sakal
विदर्भ

लोणार : वेषांतर करून ट्रॅक्टरचोर पकडला

सकाळ वृत्तसेवा

लोणार : दोन वर्षांपूर्वी चिंचोली सांगळे येथील चोरी गेलेला ट्रॅक्टर लोणार पोलिसांनी शेतकरी असल्याचे भासवत वेषांतर करत ट्रॅक्टरसह ट्रॅक्टर चोर अलगद जाळ्यात अडकवत धडाकेबाज कारवाई केल्याची घटना नुकतीच घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील शेतकरी फिर्यादी पांडुरंग ओंकार सांगळे यांचा महिंद्रा ५७५ डी आय कंपनीचा ट्रॅक्टर व सोनालिका कंपनीचा रोटाव्हेटर ९ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान घरासमोरून चोरीला गेला होता त्याबाबत लोणार पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चोरीची तक्रार दिली होती

त्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध लोणार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता दरम्यान फिर्यादीचे नातेवाईकासाठी जुना ट्रॅक्टर लोणी खुर्द तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे खरेदीसाठी गेले असता आरोपी समाधान नाथराव सोनुने वय २६ वर्ष याने फिर्यादी व त्याचे नातेवाईकाला सदर ट्रॅक्टर विक्रीसाठी दाखविला मात्र फिर्यादीने हा ट्रॅक्टर आपलाच असल्याचे ओळखले व त्यांना उद्या पैसे घेऊन येतो असे सांगितले व घडलेल्या प्रकाराची माहिती लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना सांगितली या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे, रामकिसन गीते, नितीन खरडे,

गजानन डोईफोडे, कृष्णा निकम, ज्ञानेश्वर निकस यांना आरोपी व ट्रॅक्टर ताब्यात घेण्याबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या यावेळी लोणार पोलिसांनी शेतकरी असल्याचे भासवत वेषांतर करून लोणी खुर्द तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे आरोपीकडे ट्रॅक्टर विक्री बाबत चर्चा केली.

यावेळी आरोपीने मढी शिवारात असलेल्या एका शेतामध्ये सदर ट्रॅक्टर दाखवले ट्रॅक्टर दाखवताच लोणार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याजवळ असलेले चोरीचे ट्रॅक्टर व रोटाव्हेटर लोणार पोलीस स्टेशनला आणून जमा केले. आरोपीला काल (ता. २८) न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाचा रिमांड मिळाला असून अजून त्याच्यासोबत ट्रॅक्टर चोरी करण्याकरता किती साथीदार आहे व लोणार तालुक्यातून आतापर्यंत चोरी गेलेल्या ट्रॅक्टर चा उलगडा होण्याची शक्यता आहे व या ट्रॅक्टर चोरी करणार्‍या टोळीची साखळी कुठपर्यंत आहे हे तपासअंती कळेल लोणार पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे नापोका नितीन खरडे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT