विदर्भ

‘कमल का फूल ही सबसे बडी भूल है!’ यशोमती ठाकूर यांची मोदी सरकारवर टीका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला सत्तेत येऊन रविवारी (ता. ३०) सात वर्षे पूर्ण (Narendra Modi government completes seven years) झाली. सरकारच्या पहिल्या पंचवार्षिकात मोठे निर्णय घेण्यात आले. दुसऱ्या पंचवार्षिकात दोन वर्षे पूर्ण झाले. मात्र, विरोधक सरकारवर टीका करण्याचा एकही मुद्दा सोडत नाही आहे. मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असताना ‘मोदी सरकार से पहले ये देश सोने की चिडीया था, अब तो @Twitter की नीली चिडीया भी देश में सुरक्षित नाही’ असे ट्विट महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Women and Child Welfare Minister Yashomati Thakur) यांनी केले आहे. (‘Lotus-flower-is-the-biggest-mistake!’-Yashomati-Thakur-criticizes-Modi-government)

देशाची मोठी लोकसंख्या आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर मोदी सरकारने भर द्यायला हवा होता. मात्र, स्वतःची प्रतिमा चमकवण्यात मोदीजी एवढे मग्न झाले की जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. सात वर्षांतील कामकाज पाहिले तर मागची सत्तर वर्षे म्हणजे सुवर्णकाळ होता हे लोकांना पटायला लागलंय आता, असेही ट्विटमध्ये यशोमती ठाकूर म्हणाल्या.

मोठ मोठे आश्वासन दाखवून देशात भाजपची सत्ता स्थापन झाली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच अच्छे दिनचा नारा देत लोकांना स्वप्न दाखवण्यात आले. मात्र, आज मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्यानंतरी या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. यामुळे आजही सरकारची विरोधक खिल्ली उडवत असल्याचे दिसत आहे.

‘सात वर्षांत ना केला विकास मोदींनी केला देश भकास’, ‘मोदी सरकारच्या गलथान कारभारामुळे जनता लसीसाठी तरसली’, ‘स्वतःची प्रतिमा चमकावयाला मोदी सरकारने केली लसीची मोठ्या प्रमाणात निर्यात’, ‘सात साल में लोग समझ गए है की कमल का फूल ही सबसे बडी भूल है!’ अशी टीकाही त्यांनी यशोमती ठाकूर यांनी ट्विटमध्ये केली आहे.

(‘Lotus-flower-is-the-biggest-mistake!’-Yashomati-Thakur-criticizes-Modi-government)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT