विदर्भ

प्रेमीयुगुलाची आत्महत्या; एकाच ठिकाणी केले अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

धारणी (जि. अमरावती) : तालुक्यातील सुसर्दा वनपरिक्षेत्रालगत मध्य प्रदेशातील सागमली गावाची सीमा आहे. तेथील प्रेमीयुगुलाने (Lovers) राजपूर गावालगत असलेल्या वनखंड क्रमांक १०७ मध्ये विष पिऊन आत्महत्या (Suicide by drinking poison) केली. धारणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. (Lovers-commits-suicide-in-Amravati)

धारणी तालुक्यानजीक मध्य प्रदेश राज्याची सीमा अवघ्या १८ किमी अंतरावर आहे. तेथील प्रेमीयुगुल अरुण समाधान गंगतिरे (वय २५) व करिना राजू कासदेकर (वय १७) दोघेही रा. सागमली (ता. खकनार, जि. बऱ्हाणपूर) हे घरून १९ दिवसांपूर्वी पळून गेले होते. त्यांचा शोध घरच्यांनी मध्य प्रदेशातील पोलिसांच्या मदतीने घेतला. परंतु, ते कोणालाही दिसले नाही.

गावातील काही युवक मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या सुसर्दा वनपरिक्षेत्रालगत असलेल्या वनखंड क्रमांक १०७ मध्ये गुरे चारत असताना दोघांचे मृतदेह आढळून आला. त्याठिकाणी विषारी औषधीची बाटली दिसून आली. त्यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर युवकांनी गावात येऊन दोघांच्याही घरच्यांना माहिती दिली. त्यांनी सायंकाळी सात वाजता घटनास्थळावर जाऊन पाहणी केली व राजपूर येथील पोलिस पाटलाला घटनेची माहिती दिली.

पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, एपीआय देवेंद्र ठाकूर, एपीआय प्रशांत गीते, पोलिस कर्मचारी सुभाष सावलकर, बाबूलाल कासदेकर यांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही मृतदेह धारणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. रविवारी शवविच्छेदन पार पडल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर सागमली गावात दोघांवरही एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

(Lovers-commits-suicide-in-Amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

Anuskura Ghat Road Repair : कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास आता सुसाट! अणुस्कुरा घाटातील 25 किमी रस्त्याचे होणार मजबुतीकरण, 5 कोटींचा निधी मंजूर

सैराट फेम अरबाज शेख अडकला लग्नबंधनात; गर्लफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला निकाह, होतोय अभिनंदनाचा वर्षाव

Angarki Sankashti Chaturthi 2026: आसपासच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरू करा श्रीगणेशाच्या 'या' रक्षा मंत्राचा जप

Latest Marathi News Live Update : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला; बँकिंग क्षेत्रावर दबाव

SCROLL FOR NEXT