file photo
file photo 
विदर्भ

कनेरीजवळच्या नाल्यात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

सडक अर्जुनी (गोंदिया)  : कनेरीजवळच्या नाल्यात प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 17) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. संदीप यशवंत कावळे (वय 23) व संगीता शत्रुघ्न बोहारे (वय 16) अशी या प्रेमीयुगुलांची नावे असून, दोघेही कनेरी राम येथील रहिवासी आहेत.
मंगळवारी सकाळी कनेरी येथील एक शेतकरी शेतात गेले होते. दुर्गंधी आल्याने त्यांनी गावात येऊन सांगितले. तसेच डुग्गीपार पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार विजय पवार यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला ओळख पटविणे कठीण झाले होते.
दरम्यान, कनेरी येथील संगीता बोहारे ही बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी 4 सप्टेंबरला पोलिसांत दिली होती. या तक्रारीची नोंद घेतल्याची माहिती ठाणेदार पवार यांनी दिली. दरम्यान, उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू असताना अखेर दोन्ही मृतांची ओळख पटली. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागीच शवविच्छेदन करण्यात आले.
घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील पोलिस निरीक्षक खोसरे यांच्यासह मृतांचे नातेवाईक उपस्थित होते. तपास पोलिस उपनिरीक्षक सोळंके करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT