news gun firing 
विदर्भ

पोलिसाची आत्महत्या; म्युकरमाकोसिसमुळे गमावला होता डोळा

नामदेव कुंभार

नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिट मध्ये कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 46 वर्षीय प्रमोद यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. प्रमोद यांना म्युकरमायकोसिस आजार झाला होता. यामध्ये त्यांनी आपला डोळाही गमावला होता. तेव्हापासून प्रमोद नैराश्यात होते. शनिवारी प्रमोद यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

झिंगाबाई टाकळी येथील निवासस्थानी प्रमोद यांनी शनिवारी दुपारी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, त्यामध्ये घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस कर्मचारी प्रमोद मेरगुवार यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली होती. पण, त्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिस या आजारेन ग्रासलं. यामध्ये एक डोळाही गमावावा लागला होता. तर दुसरा डोळा 80 टक्के कार्यरत नसल्याचं समोर आलं. एकूणच या परिस्थितीमुळे प्रमोद मेरगुवार नैराश्येत गेले होते. यातूनच प्रमोद यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

प्रमोद यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केल्याची माहिती समजताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे रवाना करून तपास सुरू करण्यात आला आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT